Opening Bell Today: चालू आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. सोमवारी मुंबईत निवडणुका असल्याने शेअर बाजाराचं कामकाज सुरू नव्हतं. मंगळवारी शेअर बाजारामध्ये घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 53 अंकांनी घसरून 73914 अंकांवर उघडला, तर निफ्टी 15 अंकांच्या घसरणीवर 22487 अंकांवर उघडला.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात किंचित वाढ नोंदविण्यात आली, तर उर्वरित निर्देशांक घसरणीसह काम करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओएनजीसी, हिंडाल्को, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स वधारले. तर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, ब्रिटानिया, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, डिव्हिस लॅब आणि महिंद्रा यांचे शेअर्स घसरणीवर व्यवहार करत होते
प्री ओपन मार्केटची स्थिती
प्रो ओपन व्यवहारात बीएसई सेन्सेक्स घसरणीसह व्यवहार करत होता. प्री ओपन व्यवहारात बीएसई सेन्सेक्स १६३ अंकांनी घसरून ७३८४३ अंकांवर तर निफ्टी ९७ अंकांनी घसरून २२४०४ अंकांवर व्यवहार करत होता. भारतीय शेअर बाजारात शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आलीय. इक्विटी ट्रेडिंगमध्ये कोणताही मोठा अडथळा येऊ नये म्हणून शेअर बाजारानं शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशन आयोजित केलं होतं.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, इरकॉन इंटरनॅशनल आणि विप्रो लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि इंजिनीअर इंडिया लिमिटेड मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह व्यवहार करत होते. गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.