Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली

Opening Bell: शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स २१२ अंकांनी घसरून ७४३२२ अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 09:45 AM2024-05-30T09:45:06+5:302024-05-30T09:46:12+5:30

Opening Bell: शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स २१२ अंकांनी घसरून ७४३२२ अंकांवर उघडला.

Opening Bell Sensex Nifty opens with decline TATA Steel falls bank shares shine | Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली

Opening Bell: शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स २१२ अंकांनी घसरून ७४३२२ अंकांवर तर निफ्टी ६२ अंकांनी घसरून २२६४३ अंकांवर उघडला. एसबीआय, ओएनजीसी, कोटक बँक, हिंडाल्को, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्स वधारले, तर टाटा स्टील, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डीज, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा आणि महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 

प्री ओपन मार्केटची स्थिती
 

गुरुवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स २५८ अंकांनी घसरून ७४२४४ अंकांवर तर निफ्टी १२५ अंकांनी घसरून २२५८० अंकांवर कामकाज करत होता.. शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. आशियाई शेअर बाजारात गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण झाली. 
 

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीशी संबंधित चिंतेमुळे शेअर बाजारात सध्या चढ-उतारांचा सामना करावा लागत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्यास सुधारणांचा वेग मंदावण्याची भीती शेअर बाजाराला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शेअर बाजारात कार्यरत असलेल्या अपोलो हॉस्पिटल्स, भारत डायनॅमिक्स, गॉडफ्रे फिलिप्स, मुथूट फायनान्स आणि स्वान एनर्जी या प्रमुख कंपन्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत.
 

मल्टीबॅगर शेअरची स्थिती
 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि निफ्टी ऑटो इंडेक्स ग्रीन झोनमध्ये काम करत होते, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये काम करत होते. गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ७ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करीत होते, तर एसीसी, अदानी ग्रीन आणि अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 
 

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये फेडरल बँक, अशोक लेलँड, जेनसोल इंजिनीअरिंग, युनिपार्ट्स इंडिया, डोडला डेअरी आणि महिंद्रा हॉलिडेज या कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी होती, तर सर्वोटेक, पॉलीकॅब इंडिया, फिनोलेक्स केबल, होम फर्स्ट फायनान्स आणि ला ओपाला यांच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात इंजिनीअर्स इंडिया, टीसीएस, एशियन पेंट्स, लार्सन, इरकॉन आणि विप्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तेजी दिसून आली.

Web Title: Opening Bell Sensex Nifty opens with decline TATA Steel falls bank shares shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.