Join us  

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरुवात, नंतर घसरण; ऊर्जा ग्लोबल, IREDA मध्ये वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:15 AM

सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्समध्ये थोडी घसरण दिसून आली.

शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 172 अंकांनी वाढून 72114 अंकांवर व्यवहार करत होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 63 अंकांनी वाढून 21800 अंकांवर होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात उर्जा ग्लोबलचे शेअर्स 10 टक्क्यांनी तर IREDA चे शेअर्स पाच टक्क्यांनी वधारले. पटेल इंजिनीअरिंग आणि ISMT सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली वाढ नोंदवण्यात आली. मात्र नंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण दिसून आली.

तेजीसह सुरुवात झाल्यानंतर 10 वाजताच्या सुमारास शेअर बाजारात घसरण दिसून आली. शेअर बाजाराचा निर्देशांत 43 अंकांच्या 71 अंकांच्या घसरणीसह 71,898 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टीमध्ये 15 अंकांच्या तेजीसह तो 21751 वर व्यवहार करत होता.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात निफ्टीनं मोठी वाढ नोंदवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 7 टक्के वाढ झाल्यामुळे सोमवारी निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की वॉल स्ट्रीट आजवरचा उच्चांकी स्तर गाठत आहे. अमेरिकेत, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सुधारला आहे, महागाईशी संबंधित चिंता कमी झाल्या आहेत आणि चांगल्या आर्थिक दृष्टीकोनामुळे, व्याजदरात कपातीची अपेक्षा आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओएनजीसी आणि गेलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. तर कोल इंडिया आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स रेड झोनमध्ये होते. निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक सारख्या निर्देशांकांनी सुरुवातीच्या व्यवहारात चांगली तेजी नोंदवली.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात हिंदाल्को, डॉ. रेड्डीज, विप्रो, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि एलटीआय माइंडट्रीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, आयटीसी, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड यांचेही शेअर्स वधारले शेअर्स वधारत होते. तर लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार