Join us

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरूवात; डॉ. रेड्डीजचा शेअर वधारला, हीरो मोटोकॉर्पमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:03 AM

सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली.

Stock Market Open: सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 33 अंकांनी वधारून 71615 अंकांच्या पातळीवर उघडला तर निफ्टी 18 अंकांच्या वाढीसह 21800 च्या पातळीवर ट्रेड करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी निर्देशांक वाढ नोंदवत होते तर निफ्टी बँक निर्देशांक किरकोळ घसरणीसह कामकाज करत होते. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात डॉ. रेड्डीज, विप्रो, यूपीएल, डिवीज लॅब, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. तर हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, एसबीआय, एनटीपीसी आणि टाटा कन्झ्युमर यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. 

सोमवारी, प्री-ओपन मार्केटमध्ये, बीएसई सेन्सेक्स 130 अंकांनी वधारला होता आणि 71,725 ​​अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता, तर निफ्टी 18 अंकांनी वाढून 21,800 च्या पातळीवर काम करत होता. 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 9 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स घसरणीसह काम करत होते. 

शेअर बाजारातील तेजीदरम्यान सर्वोटेक पॉवर सिस्टीम, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, पेटीएम, गल्फ ऑइल, पंजाब नॅशनल बँक, स्पाइसजेट, बीसीएल इंडस्ट्रीज आणि साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक