Join us  

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरूवात; महिंद्रामध्ये तेजी, Axis Bank चा शेअर घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:05 AM

शेअर बाजाराचं कामकाज शुक्रवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 293 अंकांच्या वाढीसह 72355 अंकांच्या पातळीवर उघडला होता.

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज शुक्रवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 293 अंकांच्या वाढीसह 72355 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 91 अंकांच्या वाढीसह 22002 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांका वाढ दिसून आली. 

शुक्रवारी शेअर बाजारात वाढ दर्शविलेल्या शेअर्सबद्दल बोलायचं तर, बीपीसीएल, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, कोल इंडिया, विप्रो, इन्फोसिस आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर ओएनजीसी, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सर्व निफ्टी निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी तेजीसह व्यवहार करत होते. 

शुक्रवारी, प्री ओपन मार्केटमध्ये शेअर बाजार 326 अंकांच्या वाढीसह 72377 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 118 अंकांच्या वाढीसह 22029 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत करत होता. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार