Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरुवात, टाटा मोटर्सनं टाकला 'टॉप गिअर', पॉवर ग्रिड आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 9:47 AM

मंगळवारी शेअर बाजारातील कामकाज काहीशा वाढीसह सुरू झालं. वाचा कोणत्या शेअर्समध्ये तेजी, कोणते घसरले.

मंगळवारी शेअर बाजारातील कामकाज काहीशा वाढीसह सुरू झालं . बीएसई सेन्सेक्स 67 अंकांनी 71807 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 13 अंकांच्या वाढीसह 21785 अंकांच्या पातळीवर उघडला. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात वाढ दिसून आली, तर निफ्टी बँक निर्देशांक किरकोळ घसरणीसह व्यवहार करत होते. 

टाटा मोटर्स, कोल इंडिया, सन फार्मा आणि सिप्ला यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली, तर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, हिंदाल्को, ॲक्सिस बँक, एसबीआय लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील आणि कोटक बँक यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारात वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डीज, विप्रो, एचसीएल टेक, बीपीसीएल आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचाही समावेश होता. 

मंगळवारी, प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये 239 अंकांची तेजी दिसून आली होती आणि तो 71970 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टी 53 अंकांच्या तेजीसह 21825 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी शेअर बाजारात कन्सोलिडेशन दिसून येईल. अदानी टोटल प्रायव्हेट लिमिटेडच्या धामरा टर्मिनलला 15 कमर्शिअल एलएनजी कार्गो प्राप्त झाले आहेत. मे 2023 मध्ये ऑपरेशन्स सुरू केल्यापासून, कंपनी 55 टक्के युटिलायझेशन रेटनं कार्यरत आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारटाटा