Join us

Opening Bell: सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; HDFC Bank वधारला, आयशर मोटर्समध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 9:45 AM

शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. BSE सेन्सेक्स 253 अंकांच्या वाढीसह 73901 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. BSE सेन्सेक्स 253 अंकांच्या वाढीसह 73901 अंकांच्या पातळीवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 75 अंकांच्या वाढीसह 22412 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह कामकाज करत होते.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात ज्या कंपन्यांच्या शेअरनं गती दाखवली त्या कंपन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये टाटा कंझ्युमर, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्सचा समावेश होता. तर आयशर मोटर्सच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती 

मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात एचसीएल टेक, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, लार्सन, टीसीएस आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये वाढ झाली. गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात तेजीसह व्यवहार करत होते. अदानी ग्रीनचे समभाग दोन टक्क्यांनी वधारले तर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये किंचित वाढ दिसून आली. 

प्री ओपन मार्केटची स्थिती 

मंगळवारी, प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 74048 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता, तर निफ्टी 110 अंकांनी वाढून 22447 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. शेअर बाजारातील कामकाज तेजीसह सुरू होऊ शकतं असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते.

टॅग्स :शेअर बाजार