Stock Market Open Today : मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 97 अंकांच्या घसरणीसह 72600 स्तरावर तर निफ्टी 38 अंकांच्या घसरणीसह 22084 स्तरावर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण दिसून आली होती, तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक वाढीनं कामकाज करत होते.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान पॉवर ग्रिड, कोटक बँक, डॉ. रेड्डीज, हिंदाल्को, ओएनजीसी, यूपीएल आणि एलटीआय माइंडट्रीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर कोल इंडिया, महिंद्रा, आयशर मोटर्स, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह आणि मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 7 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत होते, तर एनडीटीव्ही, अदानी विल्मर आणि अदानी टोटलच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाल्याचं दिसून आलं.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं तर ब्रँड कॉन्सेप्ट, कोटक महिंद्रा, एनएमडीसी, पंजाब अँड सिंध बँक, पटेल इंजिनिअरिंग, युनि पार्ट्स, ग्लोबस स्पिरिट्स, एशियन पेंट्स, ओएनजीसी, हिंदुस्थान झिंक, HDFC. बँक, जिओ फायनान्शियल आणि कामधेनू लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर लार्सन अँड टुब्रो, नेस्ले, टाटा स्टील, एक्साइड इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, स्टोव्ह क्राफ्ट, इंजिनियर्स इंडिया, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, ओम इन्फ्रा आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.