Join us

Opening Bell: शेअर बाजारानं पुन्हा रचला इतिहास, 'ऑल टाईम हाय'वर; NTPC मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 9:51 AM

गुरुवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सकारात्मक सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 74,278 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: गुरुवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सकारात्मक सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 74,278 अंकांच्या पातळीवर उघडला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 122 अंकांच्या वाढीसह 22557 अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर त्यात थोडी घसरण दिसून आली.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात एचडीएफसी बँक, हिंदाल्को, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, कोल इंडिया आणि मारुती सुझुकी यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. तर आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँकेचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. 

बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजाच्या अखेरिस थोडा तोटा नोंदवला गेला आणि बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह बंद झाले. गुरुवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 402 अंकांच्या वाढीसह 74279 अंकांवर तर निफ्टी 118 अंकांच्या वाढीसह 22550 अंकांवर उघडला. गुरुवारी भारतातील शेअर बाजाराचे कामकाज सकारात्मक सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. 

फेडरल रिझर्व्हच्या वक्तव्यातून संकेत 

या वर्षाच्या उर्वरित महिन्यांत व्याजदर कपातीची शक्यता पाहत असल्याचं वक्तव्य यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटलं. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे आर्थिक धोरण जाहीर होणार आहे, त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात सावध व्यवहार होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळेही शेअर बाजारात चढउतार होऊ शकतात. 

एप्रिलमध्ये निफ्टी विक्रमी पातळी गाठेल, असं ऐतिहासिक आकडेवारीवरून दिसून येत आहे. शॉर्ट टर्मनुसार, निफ्टीला 22021 च्या पातळीवर सपोर्ट आहे, तर इंट्राडे सपोर्ट म्हणून निफ्टी 22339 ची पातळी राखू शकतो.

टॅग्स :शेअर बाजार