Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell : शेअर बाजाराची मजबूत सुरुवात; बँकिंग आणि फिन सर्व्हिस स्टॉक्समध्ये तेजी, सेन्सेक्स ७३१०० पार उघडला

Opening Bell : शेअर बाजाराची मजबूत सुरुवात; बँकिंग आणि फिन सर्व्हिस स्टॉक्समध्ये तेजी, सेन्सेक्स ७३१०० पार उघडला

गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीनं झाली. बीएसई सेन्सेक्स 153 अंकांच्या वाढीसह 73149 वर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:00 AM2024-03-28T10:00:34+5:302024-03-28T10:00:41+5:30

गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीनं झाली. बीएसई सेन्सेक्स 153 अंकांच्या वाढीसह 73149 वर उघडला.

Opening Bell Stock market starts strong Sensex opens above 73100 on gains in banking and fin services stocks | Opening Bell : शेअर बाजाराची मजबूत सुरुवात; बँकिंग आणि फिन सर्व्हिस स्टॉक्समध्ये तेजी, सेन्सेक्स ७३१०० पार उघडला

Opening Bell : शेअर बाजाराची मजबूत सुरुवात; बँकिंग आणि फिन सर्व्हिस स्टॉक्समध्ये तेजी, सेन्सेक्स ७३१०० पार उघडला

गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीनं झाली. बीएसई सेन्सेक्स 153 अंकांच्या वाढीसह 73149 वर उघडला. तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी 50 ने देखील या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 39 अंकांच्या वाढीसह 22163 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला. यानंतर सेन्सक्समध्ये कामकाजादरम्यान 450 अकांची वाढ झाली. सुरुवातीच्या व्यवहारात विप्रो, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, स्टेट बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टाटा स्टील यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
 

सुरुवातीच्या व्यवहारात ऑटो, बँकिंग, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी निर्देशांकात वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज पुन्हा तेजीसह उघडले. बजाज ऑटो, टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीला वाढ झाली. इन्फोसिसच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
 

गेल्या आठवड्यात एका छोट्या करेक्शन फेजनंतर निफ्टीमध्ये पुन्हा खरेदी दिसून आली आणि आपला मजबूत सपोर्ट झोन 22000 च्या लेव्हलच्या वर गेला आहे. गेल्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये मजबूती दाखवत आपल्या महत्त्वाच्या रेझिस्टंस लेव्हलला निफ्टीनं पार केलंय. निफ्टीच्या या तेजीमागे रिलायन्सची महत्त्वाची भूमिका दिसून येते. गुरुवारी एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्येही खरेदीचं सत्र दिसून येतंय.

Web Title: Opening Bell Stock market starts strong Sensex opens above 73100 on gains in banking and fin services stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.