Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; अदानी पोर्ट्सचे शेअर वधारले, विप्रोमध्ये घसरण

Opening Bell: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; अदानी पोर्ट्सचे शेअर वधारले, विप्रोमध्ये घसरण

शेअर बाजारातील कामकाज सोमवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 85 अंकांच्या वाढीसह 72 511 अंकांच्या पातळीवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 09:39 AM2024-02-19T09:39:47+5:302024-02-19T09:40:00+5:30

शेअर बाजारातील कामकाज सोमवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 85 अंकांच्या वाढीसह 72 511 अंकांच्या पातळीवर उघडला.

Opening Bell Stock markets up on first day of week Adani Ports up Wipro down bse nse sensex | Opening Bell: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; अदानी पोर्ट्सचे शेअर वधारले, विप्रोमध्ये घसरण

Opening Bell: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; अदानी पोर्ट्सचे शेअर वधारले, विप्रोमध्ये घसरण

Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज सोमवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 85 अंकांच्या वाढीसह 72 511 अंकांच्या पातळीवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36 अंकांच्या वाढीसह 22076 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक निर्देशांकात तेजी दिसून आली तर, निफ्टी आयटी निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होता.
 

सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, डॉ. रेड्डीज लॅब, अदानी पोर्ट, एनटीपीसी आणि बीपीसीएलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर टीसीएस, एचडीएफसी लाईफ, विप्रो, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा. आणि एलटीआय माइंडट्रीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही वाढ झाली होती.
 

सोमवारी सुरुवातीच्या कामकाजादरम्यान गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 9 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. केवळ ACC लिमिटेडच्या ​​शेअर्समध्ये किंचित घसरण दिसून आली.
 

प्री-ओपन ट्रेडमध्ये, बीएसई सेन्सेक्स 175 अंकांच्या वाढीसह 72601 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 63 अंकांच्या वाढीसह 22103 अंकांच्या पातळीवर काम करत होता. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात खूप चढ-उतार दिसून आले होते, परंतु आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार सकारात्मक दिसून आला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जगभरातील शेअर बाजारांवर दबाव आहे.

Web Title: Opening Bell Stock markets up on first day of week Adani Ports up Wipro down bse nse sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.