Join us

Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:02 AM

Stock Market Open Today:  चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ९९ अंकांच्या वाढीसह ७२५०४ अंकांवर उघडला.

Stock Market Open Today:  चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ९९ अंकांच्या वाढीसह ७२५०४ अंकांवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५२ अंकांच्या वाढीसह २२००२ अंकांवर उघडला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये आणखी वाढ होऊन तो ७२,७६३ अंकांवर पोहोचला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ दिसून आली होती.  

कोण टॉप गेनर्स / लूझर्स 

बीपीसीएल, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प आणि ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात वधारले, तर इन्फोसिस, ब्रिटानिया, एचडीएफसी बँक, एलटीआय माइंडट्री, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स आणि एचसीएल टेक चे समभाग घसरले. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान लार्सन अँड टुब्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बाटा इंडिया, ऑल कार्गो लॉजिस्टिक्स आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वधारले. तर विप्रो, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरले.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. अदानी पॉवरचे शेअर्स दोन टक्क्यांहून अधिक वधारले, तर एसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये किरकोळ तेजी दिसून आली.

प्री ओपन मार्केटची स्थिती 

चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू होणं अपेक्षित होतं. प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ८१ अंकांच्या वाढीसह ७२४८५ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ५३ अंकांच्या वाढीसह २२०१० अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचं कामकाज तेजीनं सुरू होऊ शकतं, असं संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. दरम्यान, आशियाई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात तेजी दिसून आली. 

टॅग्स :शेअर बाजार