Join us  

सरकारी कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी, प्राईज बँड ₹४० पेक्षाही कमी; जमवणार ₹२१५० कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 3:04 PM

सध्या शेअर बाजारात आयपीओचा बोलबाला आहे. यातच आता सरकारी कंपनी इरेडा (IREDA) देखील लाईनमध्ये आहे.

सध्या शेअर बाजारात आयपीओचा बोलबाला आहे. यातच आता सरकारी कंपनी इरेडा (IREDA) देखील लाईनमध्ये आहे. २१ नोव्हेंबर रोजी कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. तर यामध्ये २३ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. या आयपीओद्वारे सरकारी कंपनी २१५० कोटी रुपये जमवण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनी न्यू आणि रिन्यूएबल एनर्जी, तसंच स्मार्ट मीटरसारख्या प्रोजेक्टचं फायनान्सिंग, प्रमोशन आणि डेव्हलपमेंटचं काम करणाऱ्या कंपनीच्या आयपीओचा प्राईज बँड ३० ते ३२ रुपये प्रति शेअर निश्चित केलाय.इरेडा आयपीओ२१ ते २३ नोव्हेंबरपर्यंत आयपीओ खुला राहणार.प्राईज बँड - ३० ते ३२ रुपये प्रति शेअर.लॉट साईज - ४६० शेअर्सकिमान गुंतवणूक - १४७२० रुपयेआयपीओ साईज - २१५० कोटी रुपयेफ्रेश इश्यू - १२९० कोटी रुपयेओएफएस - ८६० कोटी रुपये

IREDA चा व्यवसायया सरकारी कंपनीची स्थापना १९८७ मध्ये झाली. केंद्र सरकारच्या न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाच्या अंतर्गत याचं कामकाज चालतं. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचा स्टेटस असलेली ही महत्त्वाची एनबीएफसी आहे. केवळ ग्रीन फायनान्सिंग वाली देशातील सर्वात मोठी एनबीएफसी आहे. त्यांना या क्षेत्रातील ३६ वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. रिन्युएबल एनर्जीचं प्रमोशन आणि डेव्हलपमेंटसाठी सरकारच्या पुढाकारातील IREDA ची महत्त्वाची भूमिका आहे. ही कंपनी न्यू आणि रिन्यूएबल एनर्जी आणि स्मार्ट मीटर सारख्या प्रोडक्टचं फायनान्सिंग, प्रमोशन आणि डेव्हलपमेंटचं काम करते.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारसेबी