Join us  

TCS च्या शेअरमधून पैसे कमावण्याची संधी, कंपनी करणार शेअर बायबॅक; आली रेकॉर्ड डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:51 AM

तुमच्याकडे टीसीएसचे शेअर्स असतील आणि ते चांगल्या किमतीत विकायचे असतील, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.

तुमच्याकडे टीसीएसचे शेअर्स (TCS Share News) असतील आणि ते चांगल्या किमतीत विकायचे असतील, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. देशातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएस आपले शेअर्स बायबॅक करणार आहे. टीसीएसची १७ हजार कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करण्याची योजना आहे. कंपनीने या बायबॅकसाठी २५ नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख ठरवली आहे. कंपनीने बुधवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये दिलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली. बायबॅकमध्ये, कंपन्या खुल्या बाजारातील भागधारकांकडून त्यांचे स्वतःचे शेअर्स खरेदी करतात.शेअरमध्ये येऊ शकते तेजीटाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसचा शेअर बुधवारी बीएसईवर २.०३ टक्क्यांनी किंवा ६७.६० रुपयांच्या वाढीसह ३३९९.३० रुपयांवर बंद झाला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३,६८० रुपये आहे. तर, ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३,०७० रुपये आहे. बुधवारी बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप १२,४३,८२१ कोटी रुपये होते. बायबॅकची रेकॉर्ड डेट जसजशी जवळ येईल तसतसे टीसीएसचे शेअर्स वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येतेय.काय आहे बायबॅक प्राईज?कंपनीनं ११ ऑक्टोबर रोजी शेअर बायबॅकची घोषणा केली होती. कंपनीनं १ रुपये फेस व्हॅल्यूचे ४,०९,६३,८५५ पूर्ण पेड इक्विटी शेअर्स ४,१५० रुपये प्रति शेअर या दरानं बायबॅक करण्याची घोषणा केली होती. टीसीएस वेळोवेळी शेअर बायबॅक करते. टीसीएसचा गेल्या ६ वर्षांतील हा पाचवा शेअर बायबॅक आहे.

कंपनीचा नफा वाढलाकंपनीच्या तिमाही निकालांबद्दल बोलायचं झालं तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीनं ११,४३२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. अशाप्रकारे, सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ८.७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

टॅग्स :टाटाशेअर बाजार