Join us  

TATA 'या' शेअरमध्ये नफा कमावण्याची संधी! २० एक्सपर्ट्स म्हणाले,"खरेदी करा", झुनझुनवालांचाही आहे फेवरेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 3:11 PM

Tata Group Stock: टाटा समूहाचा शेअर अंतिम लाभांश देण्याच्या रेकॉर्ड डेटपूर्वी फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर ३,४०१.५० रुपयांवर व्यवहार करत होता.

Tata Group Stock: टाटा समूहाचा शेअर टायटन कंपनी लिमिटेडचा अंतिम लाभांश देण्याच्या रेकॉर्ड डेटपूर्वी फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर ३,४०१.५० रुपयांवर व्यवहार करत होता. यावर्षी ३ मे रोजी कंपनीने तिमाही निकालांसह प्रति शेअर ११ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला, जो २०१० नंतरचा सर्वाधिक लाभांश आहे. २०१० नंतर कंपनीने १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सही जारी केले आणि १० रुपयांच्या एका शेअरला १ रुपयांच्या दहा शेअर्समध्ये विभाजित करून आपला स्टॉक स्प्लिट केला होता.

टायटनच्या अंतिम लाभांशाची विक्रमी तारीख २७ जून आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी २६ जून किंवा त्यापूर्वी टायटनचे शेअर्स खरेदी केले आहेत, ते लाभांश देण्यास पात्र असतील. टायटन दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा सर्वात मोठे पोर्टफोलिओ होल्डिंग आहे, जे आता रेखा राकेश झुनझुनवाला यांच्या नावे आहे. मार्च तिमाहीपर्यंत त्यांची होल्डिंग्स ५.३५% होती, ज्याचं मूल्य सध्याच्या बाजार भावानुसार १६,१४४ कोटी रुपये होतं.

स्टॉक स्टेटस

जून महिन्यात टायटनचे शेअर्स आतापर्यंत ५ टक्के, मे महिन्यात १० टक्के आणि एप्रिलमध्ये ५.५ टक्क्यांनी वधारले आहेत. २०२४ मध्ये हा शेअर अजूनही ७.३ टक्क्यांनी घसरला आहे आणि वर्षाच्या अखेरीस हा तोटा भरून काढण्यात यश आलं नाही, तर २०१६ नंतर टायटनचा हा पहिलाच नकारात्मक परतावा ठरू शकतो. टायटनवर कव्हर करणाऱ्या ३२ विश्लेषकांपैकी २० विश्लेषकांनी 'बाय', आठ जणांनी 'होल्ड' तर चार जणांनी 'सेल' अशी शिफारस केली आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :टाटाशेअर बाजार