Join us

एकाच दिवसात ₹1187 ने वाधारला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; एका बातमीचा परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 5:04 PM

हा शेअर बुधवारी 5087.40 रुपयांवर बंद झाला होता.

ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेज सॉफ्टवेअरचा (OFSS) शेअर 18 जानेवारीला BSE वर 23% म्हणजेच तब्बल 1,187.6 रुपयांनी वधारून  6275 रुपयांवर पोहोचला आहे. हा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक ठरला. हा शेअर बुधवारी 5087.40 रुपयांवर बंद झाला होता.

डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीच्या मजबूत रिपोर्टमुळे या शेअरमध्ये ही तेजी आली आहे. कंपनीचा डिसेंबर तिमाहीतील वार्षीक आधारावरील नफा जवळपास 70 टक्क्यांनी वाढून 740.8 कोटी रुपयांवर पोहोचला आहे आणि रेव्हेन्यू 26 टक्क्यांनी वाढून 1,823.6 कोटी रुपये झाला आहे.

क्लाउड डीलचाही परिणाम - ओरॅकलने डिसेंबर तिमाही दरम्यान नेव्ही फेडरल क्रेडिट युनियन, यूएसएसह एक एतिहासिक क्लाउड डील केली आहे आणि मॅनॅजमेंटला सर्वच सेक्टर्समध्ये एक मजबूत डील पाइपलाइन दिसत आहे. Oracle फायनान्शिअल वित्तीय सेवा उद्योगाला उत्पादने आणि सेवा पुरवते.

काय म्हणतायत ब्रोकरेज - आनंद राठी यांनी म्हटले आहे की, 'या शेअरने साप्ताहिक आधारावर मुख्य डीईएमएचे चांगल्या पद्धतीने पालन केले आहे. काही आठवड्यांपूर्वी या शेअरने आपले मागील स्विंग तोडले आणि त्यावर कायम राहिला.' दैनिक स्टोकेस्टिक्सने पुन्हा एकदा ओव्हरबाय झोनमध्ये प्रवेश केला आहे. हा मजबुतीचा संकेत आहे. गुंतवणूकदार 5,400 रुपयांच्या टार्गेटसाठी 4,900-5,100 रुपयांच्या दरम्यान खरेदी करू शकतात. याचा स्टॉप-लॉस दैनंदिन बंद आधारावर 4,800 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक