शेअर बाजारातील शक्ती पंप्सच्या शेअरने सध्या रॉकेट स्पीड घेतला आहे. शक्ती पंप्सचा शेअर गुरुवारी 20 टक्क्यांनी वधारून 1108.35 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या सेअरने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. शक्ती पंप्सच्या शेअरमध्ये ही तेजी एक मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर आली आहे. शक्ती पंप्सला 50,000 पंप्ससाठी महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लिमिटेडकडून (MSEDCL) लेटर ऑफ इम्पॅनलमेन्ट मिळाले आहे. कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात 184.70 रुपयांची तेजी आली आहे.
1603 कोटी रुपयांची ऑर्डर -
कंप्रेसर, पंप आणि डिझेल इंजिन उद्योगाशी संबंधित असलेल्या शक्ति पंप्सने स्टॉक एक्सचेन्जला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लिमिटेडकडून त्यांना 50000 ऑफ-ग्रिड सोलर फोटोव्होल्टिक वॉटर पंपिंग सिस्टिम्ससाठी लेटर ऑफ इम्पॅनलमेंट मिळाले आहे. PM-KUSUM स्कीमच्या (फेज-3) कंपोनन्ट-बी अंतर्गत हे पंप्स संपूर्ण महाराष्ट्रात पुरवले जातात. कंपनी म्हटल्याप्रमाणे, 50000 पंप्सची एकूण व्हॅल्यू जवळपास 1603 कोटी रुपये एवढी आहे. ही ऑर्डर 24 महिन्यांत पूर्ण करायची आहे.
गेल्या महिन्यात मिळाली होती 358 कोटी रुपयांची ऑर्डर -
शक्ति पंप्सला गेल्या महिन्यात KUSUM-3 स्कीमअंतर्गत हरियाणा रिन्यूएबल एनर्जी डिपार्टमेन्ट (HAREDA)कडून 358 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. गेल्या 6 महिन्यांत शक्ती पंप्सच्या शेअरमध्ये 154 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 19 एप्रिल 2023 रोजी 436.55 रुपयांवर होता. जो 19 ऑक्टोबर 2023 रोजी 1108.35 रुपयांवर पोहोचला. तसेच, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरने 173 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्याचा विचार करता, हा शेअर 29 टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1108.35 रुपये एवढा आहे. तर निचांक 380.15 रुपये एवढा आहे.