Lokmat Money >शेअर बाजार > कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे

कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे

Oriental Rail Infrastructure Ltd Stock: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असतानाही या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:34 AM2024-07-11T11:34:46+5:302024-07-11T11:37:17+5:30

Oriental Rail Infrastructure Ltd Stock: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असतानाही या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

Oriental Rail Infrastructure Ltd shares in focus Railway stock hit the upper circuit beats RVNL IRFC in terms of returns | कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे

कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे

Oriental Rail Infrastructure Ltd Stock: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असतानाही या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये आज ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलंय. अपर सर्किटनंतर गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ३७९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या वर्षभरात कंपनीचा परतावा रेल विकास निगम आणि आयआरएफसीपेक्षा जास्त आहे. कोट्यवधी रुपयांची नवी ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळाली आहे.

११ महिन्यांत पूर्ण करायचं हे काम

कंपनीनं शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना १९.३३ कोटी रुपयांचं काम मिळालं आहे. कंपनीला एलएचबी जीएस कोचसाठी १९४ आणि एलएचबी एससीएन कोचसाठी ९६ सीट्स तयार करायच्या आहेत. कंपनीला ११ महिन्यांत ही ऑर्डर पूर्ण करावी लागणारे. अलीकडेच कंपनीने आर्टिफिशिअल लेदर प्लांटची क्षमता दुप्पट केली आहे.

कंपनीचा मार्केट शेअर ३० टक्के

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा एकूण महसूल १०४ कोटी रुपये होता. यातील ८० टक्के रक्कम सीट आणि बर्थच्या निर्मितीतून आली. येत्या काळात डब्यांची संख्या वाढणार आहेत. यामुळे सीट्स आणि बर्थची मागणीही वाढणार आहे. ओरिएंटल रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरचा सीट आणि बर्थच्या निर्मितीत ३० टक्के मार्केट शेअर आहे.

कंपनीची उत्कृष्ट कामगिरी

सहसा चर्चेपासून दूर राहणाऱ्या या कंपनीची कामगिरीही गेल्या वर्षभरात उत्कृष्ट राहिली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ५६३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ज्या गुंतवणूकदारांनी ३ वर्षे शेअर ठेवला आहे, त्यांच्या मूल्यात आतापर्यंत ६३९ टक्के वाढ झालीये. या कंपनीत मार्च तिमाहीपर्यंत प्रवर्तकांचा ५४.८१ टक्के हिस्सा होता. तर जनतेचा वाटा ४५.१७ टक्के होता.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Oriental Rail Infrastructure Ltd shares in focus Railway stock hit the upper circuit beats RVNL IRFC in terms of returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.