Lokmat Money >शेअर बाजार > "... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?

"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?

Mahendra Singh Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एफ अँड ओ ट्रेडर्सना मोठा सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 03:58 PM2024-10-28T15:58:43+5:302024-10-28T16:02:08+5:30

Mahendra Singh Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एफ अँड ओ ट्रेडर्सना मोठा सल्ला दिला आहे.

otherwise it will be difficult to get out why ms Dhoni advised youngsters to stay away from F and O trading | "... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?

"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं (Mahendra Singh Dhoni) एफ अँड ओ ट्रेडर्सना मोठा सल्ला दिला आहे. एका मुलाखतीत त्यानं तरुणांना 'एफ अँड ओ' (F&O) पासून दूर राहण्यास सांगितलं. "आयुष्यात अनेक प्रकारचे धोके असतात जे आपण घेतले पाहिजेत. पण धोक्यांचा भार आपण उचलू शकत नाही, अशापासून मात्र दूर राहायला हवं,” असं धोनीनं म्हटलं.

F&O बाबत काय म्हणाला धोनी?

"... ज्यांची दाढी सफेद झालीये त्यांना माहितीये की ते काय करतायत. सर्वजण प्रोफेशनल ट्रेडर्स ट्रेडिंग करतात. परंतु जे तरुण आहेत त्यांनी F&O मध्ये जाऊ नये, कारण त्यातून बाहेर निघणं कठीण आहे. ज्यांना थ्रिल हवंय क्यांना काही आणखी करावं. ५००० रुपये गुंतवतो पाहू काय होतं? असा विचार करू नका. हे तुमच्यासाठी बनलेलं नाही. प्रोफेशनल ते हाताळू शकतात," असं धोनी म्हणाला.

F&O हे निराळं आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा ९० टक्के लोकं पैसे गमावतात असं त्यावर दिसून येतं. मग ते १० टक्के लोकं कोण? कोण आहेत ते १० टक्के लोकं जे ९० टक्के लोकांचा पैसा खात आहेत आणि त्यापासून पैसे बनवत आहेत. F&O मध्ये नुकसानच होतं, असंही त्यानं नमूद केलं.

एक्सपर्ट्वरही साधला निशाणा

चर्चेदरम्यान धोनीनं एक्सपर्ट्सवही निशाणा साधला. "समजा मी एक शेअर १००० ला खरेदी केला. तो १८०० ते २००० रुपयांपर्यंत पोहोचतो. नंतर तो पुन्हा १८०० वर येतो. त्या घसरणीदरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. मी विचार करतो की १००० रुपयांचे १८०० रुपये झाले. अशात जो खरेदी करतो तो पुढे डिपमध्ये कुठे जाईल. ऑल टाईम हायवर जेव्हा शेअरची कामगिरी पुढे चांगली होऊ शकते असा सल्ला येतो तेव्हा मी तो घेणारच नाही असं म्हणतो," असंही त्यांनं नमूद केलं.

Web Title: otherwise it will be difficult to get out why ms Dhoni advised youngsters to stay away from F and O trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.