जानकीरमण आर.
आर्थिक वर्ष 22 संपत असतांना, मागील आर्थिक वर्षावर एक नजर टाकत असतानांच, इक्विटी आणि इक्विटीच्या प्रत्येक कॅटेगरीत मिळालेल्या रिटर्नच्या ट्रेंडकडे लक्ष देणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा ट्रेंड बघता पुढच्या 3 वर्षांसाठी काही योजना तयार केल्या जाऊ शकतात असे गुंतवणूकदारांना वाटते आहे. मागील 3 वर्षात अनेक जागतिक घटना घडल्या आहेत. दीर्घकालीन विचार केल्यास, मिड आणि स्मॉल कॅप विभागांनी लार्ज कॅपच्या तुलनेत वेगवेगळ्या कालावधीत कशी कामगिरी केली आहे?
दीर्घ कालावधीचा अभ्यास केल्यास मिड कॅप्सने निश्चितच चांगले रिटर्न्स दिले आहेत. गुंतवणूकदार घेत असलेल्या रिस्कनुसार विचार केल्यास हा परफॉर्मन्स उत्कृष्ट असल्याचे लक्षात आलेय. मनाजोगते रिटर्न्स मिळवण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने, विशेषत: तरुण गुंतवणूकदारांनी, त्यांच्या पोर्टफोलिओत मिड कॅप शेअर ठेवावे ही काळाची गरज आहे.
युक्तिवाद असाही केला जातो की दीर्घकालीन आकड्यांवर अनेक अल्पकालीन सायकल्स(चक्रांचा) समावेश असतो. लार्ज कॅपच्या आणि मिड कॅपचा विचार केल्यास मिड कॅप्सचा परफॉर्मन्स वेगवेगळ्या सायकलमध्ये वेगवेगळा असू शकतो. ट्रेंड लाईन आणि वेगवेगळ्या सायकल्सचा कालावधी वेगवेगळा असतो. यामुळे कोणताच अचूक पॅटर्न मिळवणे कठीण आहे. डेटा आणि विचारबुद्धी अशा दृष्टीने बघितल्यास ट्रेंड लाईन कमी किंवा जास्त परफॉर्मन्स दोन्हीचा दीर्घ कालावधीसाठी विचार केला जाऊ शकत नाही. या संदर्भात, मिड कॅप्सच्या अलीकडील 3 वर्षांच्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे पुढील 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत मिड कॅप शेअर्स कमी परफॉर्मन्स दाखवू शकतात किंवा त्यात नुकसान देखील होऊ शकते.
लार्ज कॅपच्या आणि मिड कॅपचा विचार केल्यास गेल्या 3 वर्षात मिडकॅप इंडेक्सने दिलेला रिटर्न 91% असून लार्ज कॅप इंडेक्सने दिलेला रिटर्न 54% आहे. या अलीकडील परफॉर्मन्समुळे, मिडकॅप इंडेक्स येत्या वर्षात लार्जकॅप इंडेक्सपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स करण्याची शक्यता नाही.
अर्थव्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा विचार आवश्यक
स्टॅटिस्टिकल अंदाजांचा विचार न करता, अर्थव्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करणे आवश्यक आहे. मालमत्ता चक्रात मिळालेले संजीवन, कॅपेक्स सायकलमधील संभाव्य वाढ नजीकच्या कालावधीत राष्ट्रीय वाढीच्या वाढीकडे निर्देश करते. वैयक्तिक मालमत्तेत झालेली वाढ आणि अधिक उत्पन्न बाँड (क्रेडिट) यामुळे, कोविडमुळे प्रभावित झालेले कौटुंबिक अर्थकारणावर आता सुधारत असल्याचे सूचित होते. यामुळे सुज्ञपणे विचार करून खर्च केला गेला पाहिजे. चीन सारख्या उत्पादनात सामर्थ्यवान, उदयोन्मुख संधी आपल्याला विसरुन चालणार नाही. हे लक्ष्यित उत्पादन लिंक्ड इंसेंटिव्ह स्कीम्समुळे (PLI) उत्पादन क्षेत्रात गेल्या दशकात ऑफर केल्या गेलेल्या स्कीम्सच्या तुलनेत चांगली वाढ होऊ शकते. अपवादात्मक बाजू अशी आहे की अनेक पाश्चात्य अर्थव्यवस्थांना 2023 मध्ये मंदीला तोंड द्यावे लागू शकते. परिणामस्वरूप आपली निर्यात वाढ कमी होऊ शकते.
सकारात्मक घटक अधिक
या सर्व बाबींचा विचार करता, वाढीसाठी सकारात्मक असणारे घटक अधिक प्रभावी असल्याचे दिसते. ज्या वेगाने दर वाढ होते आहे ते बघता, अपेक्षित असलेली मंदी 2023 च्या पुढे टिकू शकणार नाही असे वाटते. दरवाढ वेगाने होणे, महत्त्वाचे का आहे? सर्वसाधारणपणे विचार केल्यास वेगाने होणारी दरवाढ म्हणजे, ‘मजबूत कॉर्पोरेट कमाई, कमाईत वारंवार होणारे अपग्रेड, गुंतवणूकदारांमध्ये जास्त रिस्क घेण्याची क्षमता’ आणि हेच सर्व घटक मिडकॅप्सच्या उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी अनुकूल आहेत.
परफॉर्मन्सबद्दल स्पष्टता नाही
त्यामुळे, मिड-कॅप्सचा परफॉर्मन्स किती चांगला असेल हे अजूनतरी स्पष्ट नाही. विकसित बाजारपेठेमध्ये येऊ घातलेली मंदी आणि अलीकडील काळात लार्ज कॅपच्या प्रमाणात मिड कॅप्सने दाखवलेला उत्कृष्ट परफॉर्मन्स यामुळे मिड कॅपला अधिक चांगला परफॉर्मन्स दाखवायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. यानंतर, वर नमूद केलेल्या अधिक शक्तिशाली सक्षम घटकांनी उचल घेतली पाहिजे. पुढील 2-4 तिमाहीत गुंतवणूकदार वाढीच्या या गतीला चालना देण्यासाठी पुरेसे मिड कॅप शेअर्स घेण्याचा विचार करू शकतात.
स्मॉल कॅप्सचा डेटा बघितल्यास काही निष्कर्ष काढले जाऊ शकतात. स्मॉल कॅप इंडेक्स रिटर्न्स गुंतवणूकदाराने घेतलेल्या रिस्कसाठी अगदी दीर्घ कालावधीकरिता देखील जास्त रिटर्न मिळवून देऊ शकेल असे वाटते. याशिवाय, बर्याच अनुभवी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड प्लॅन्सने इंडेक्स रिटर्नवर महत्वपूर्ण माहिती प्रकशित केली आहे. स्मॉल कॅप्स सेगमेंटमध्ये ॲक्टिव्ह मॅनेजमेंटची भूमिका मोठ्या प्रमाणात संलग्न असल्याचे या दोन्ही निरीक्षणातून दिसून येते.
लेखक फ्रँकलिन टेम्पलटन, इमर्जिंग मार्केट इक्विटी - भारत एसव्हीपी आणि पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत.