Join us  

₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:46 PM

Khyati Global Ventures IPO: शुक्रवारी हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. या आयपीओला पहिल्या दिवशी जवळपास ३ पट सब्सक्रिप्शन मिळालं.

Khyati Global Ventures IPO: सध्या शेअर बाजारात आयपीओंचा पूर आलाय. अशातच ख्याती ग्लोबल व्हेंचर्स या आणखी एका कंपनीनं आयपीओ लाँच केला आहे. शुक्रवारी हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. या आयपीओला पहिल्या दिवशी जवळपास ३ पट सब्सक्रिप्शन मिळालं. दरम्यान, यातील रिटेल हिस्सा ४.०१ पट आणि एनआयआय हिस्सा १.६६ पट बुक झाला. आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी ८ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. पाहूया याच्या डिटेल्स.

₹९९ आहे प्राईज बँड

ख्याती ग्लोबल व्हेंचर्सच्या आयपीओसाठी प्रति शेअर प्राइस बँड ९९ रुपये आहे, ज्याची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. एका लॉटमध्ये १२०० शेअर्स आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांनी कमीत कमी एका लॉटसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. त्यासाठी १ लाख १८ हजार ८०० रुपयांची व्यवस्था करावी लागणार आहे.

३१ वर्ष जुनी कंपनी

१९९३ मध्ये अस्तित्वात आलेली ख्याती ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड पूर्वी ख्याती अॅडव्हायझरी सर्व्हिसेस लिमिटेड या नावानं ओळखली जात होती. अन्न आणि बिगर-खाद्य उत्पादनं, घरगुती वस्तूंसह विविध एफएमसीजी वस्तूंची निर्यात आणि रिपॅकेजिंगवर कंपनी लक्ष केंद्रित करते. याव्यतिरिक्त, कंपनी फार्मास्युटिकल उत्पादनांच्या व्यवसायातही गुंतलेली आहे.

कंपनीचे अनेक मोठे ग्राहक

एव्हरेस्ट, पार्ले जी, एमडीएच, फॉर्च्यून, आशीर्वाद, गोवर्धन, बालाजी वेफर्स, हल्दीराम, हिमालय, डव्ह, कोलगेट, युनिलिव्हर, गोदरेज हे ख्याती ग्लोबल व्हेंचर्सचे लोकप्रिय ग्राहक आहेत. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही ख्याती ग्लोबल व्हेंचर्सच्या आयपीओची रजिस्ट्रार आहे. दरम्यान, आर्यमन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर असून आर्यमन कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही त्याची मार्केट मेकर आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक