Join us  

₹८७ चा शेअर पहिल्याच दिवशी ₹२५० वर पोहोचला, १८७% चा जबरदस्त फायदा; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 12:28 PM

कंपनीच्या स्टॉकनं शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स 187 टक्क्यांहून अधिक नफ्यासह 250 रुपयांना शेअर बाजारात लिस्ट झाले.

ओवेस मेटलनं शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. ओवेस मेटलचे शेअर्स 187 टक्क्यांहून अधिक नफ्यासह 250 रुपयांना शेअर बाजारात लिस्ट झाले. जबरदस्त लिस्टिंगमुळे कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे, त्यांच्या पैशात दुपटीनं वाढ झाली आहे. आयपीओमध्ये, कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 87 रुपयांना अलॉट करण्यात आले होके. ओवेस मेटलचा (Owais Metal) आयपीओ 26 फेब्रुवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला आणि तो 28 फेब्रुवारीपर्यंत खुला होता. 

शेअरनं पकडला रॉकेट स्पीड 

नफ्यासह लिस्टिंग झाल्यानंतर ओवेस मेटलच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला. लिस्ट झाल्यानंतर, कंपनीचे शेअर्स 4% ने वाढून 262.50 रुपयांवर पोहोचले. ओवेस मेटलच्या शेअरनं 241 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले. किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये 1 लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना 139200 रुपये गुंतवावे लागले. ओवेस मेटल आणि मिनरल प्रोसेसिंग लिमिटेडची सुरुवात 2022 मध्ये करण्यात आली. कंपनी मेटल्स आणि मिनरल्सचं प्रोडक्शन आणि प्रोसेसिंगच्या व्यवसायात कार्यरत आहे. ओवेस मेटलचा आयपीओ एकूण 221.18 पट सबस्क्राईब झाला होता. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार