Lokmat Money >शेअर बाजार > पाकिस्तानची वाईट अवस्था; टाटांच्या एका कंपनीचे मार्केट कॅप पाक शेअर बाजाराच्या 7 पट जास्त

पाकिस्तानची वाईट अवस्था; टाटांच्या एका कंपनीचे मार्केट कॅप पाक शेअर बाजाराच्या 7 पट जास्त

पाकिस्तान सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 02:08 PM2023-07-06T14:08:03+5:302023-07-06T14:09:13+5:30

पाकिस्तान सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

Pakistan Economy: Bad state of Pakistan; The market cap of a Tata company is 7 times that of the Pakistan stock market | पाकिस्तानची वाईट अवस्था; टाटांच्या एका कंपनीचे मार्केट कॅप पाक शेअर बाजाराच्या 7 पट जास्त

पाकिस्तानची वाईट अवस्था; टाटांच्या एका कंपनीचे मार्केट कॅप पाक शेअर बाजाराच्या 7 पट जास्त

Pakistan Economy:पाकिस्तानात परिस्थिती आहे कोणापासून लपून राहिलेले नाही. पाकिस्तान गेल्या 75 वर्षातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा (Pakistan Economy) सामना करत आहे. पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्या प्रगत देशांसमोर मदत मागून झाल्यानंतर अखेर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला $3 अब्जांची मदत मंजूर केली आहे. पण पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला पाकिस्तान, या परिस्थितीतून कधी बाहेर येईल, हे सांगणे कठीण आहे.

सरकारची तिजोरी जवळपास रिकामी झाली असून पाकिस्तानी रुपयाही दररोज घसरत आहे. दरम्यान, पाकिस्तानी शेअर बाजारावरही (Pakistan Share Market) याचा मोठा परिणाम दिसून येतोय. पाकिस्तानी शेअर बाजाराच्या परिस्थितीचा अंदाज यावरून लावता येईल की, भारतातील दिग्गज टाटा समूहाच्या (Tata Group) एका कंपनीचे मार्केट कॅप पाकिस्तानच्या संपूर्ण स्टॉक मार्केटच्या मूल्यापेक्षा सुमारे 7 पट जास्त आहे.

गेल्या सहा वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर पाकिस्तानी शेअर बाजाराचे बाजार भांडवल सातत्याने कमी होत आहे. मे 2017 मध्ये PAK शेअर मार्केटचा सर्वाधिक निर्देशांक KSE100 52,000 वर होता आणि शेअर बाजाराचे मूल्य $99.52 अब्ज होते. पुढील वर्षी मे 2018 मध्ये, देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, ते $ 76.30 अब्ज इतके कमी झाले. सध्या याचे मूल्य सुमारे $ 20 अब्जावर घसरले आहे. 

अदानी-टाटांच्या कंपन्या पुढे
विशेष म्हणजे, गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी पोर्ट कंपनीचे मार्केट कॅप सुमारे $ 20 अब्ज आहे. म्हणजेच अदानीच्या केवळ एका कंपनीचे मूल्य पाकिस्तानी शेअर बाजाराएवढे आहे. आता टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बद्दल बोला, तर तिचे बाजार भांडवल सुमारे $147 अब्ज आहे. हा आकडा पाकिस्तानी शेअर बाजाराच्या बाजारमूल्याच्या सातपट जास्त आहे. भारतीय रुपयात पाहिल्यास, TCS चे मूल्यांकन 12.16 लाख कोटी रुपये आहे. केवळ टीसीएसच नाही तर भारतीय व्यावसायिक क्षेत्रात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे मूल्य पाक शेअर बाजारापेक्षा जास्त आहे.

या भारतीय कंपन्यांचे मूल्यही जास्त 
पाकिस्तानी शेअर बाजाराच्या एकूण मूल्याएवढे बाजार भांडवल असलेल्या काही भारतीय कंपन्यांबद्दल बोलायचे तर त्यात एनटीपीसी लिमिटेड (मार्केट कॅप - $ 22.90 अब्ज), महिंद्रा अँड महिंद्रा (मार्केट कॅप - $ 22.48 बिलियन), पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पॉवरग्रिड) (मार्केट कॅप – $21.57 अब्ज) आणि गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी पोर्ट (अदानी पोर्ट, $20 अब्ज).
 

 

Web Title: Pakistan Economy: Bad state of Pakistan; The market cap of a Tata company is 7 times that of the Pakistan stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.