Lokmat Money >शेअर बाजार > Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Patel Engineering Ltd Multibagger Stock: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात या शेअर्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 342 टक्क्यांची वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 03:48 PM2024-05-11T15:48:50+5:302024-05-11T15:49:24+5:30

Patel Engineering Ltd Multibagger Stock: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात या शेअर्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 342 टक्क्यांची वाढ झाली.

Patel Engineering Ltd Doubling money in a year shares giving tremendous returns for 3 years Experts are bullish | Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Patel Engineering Ltd Multibagger Stock: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारातील पटेल इंजिनीअरिंगच्या शेअर्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 342 टक्क्यांची वाढ झाली. 7 मे 2021 रोजी पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरची किंमत 12.45 रुपये प्रति शेअर होती. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.63 टक्क्यांनी वधारून 55.96 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचे मार्केट कॅप 4725.13 रुपयांच्या पातळीवर पोहोचले.
 

वर्षात पैसे दुप्पट
 

गेल्या वर्षभरात बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात 101 टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरच्या किमतीत 122 टक्क्यांची वाढ झाली. दरम्यान, कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांसाठी 2024 हे वर्ष फारसे चांगलं राहिलं नाही. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 15 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे.
 

पटेल इंजिनीअरिंगचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 24.15 रुपये आणि 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 79 रुपये प्रति शेअर आहे. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीची टार्गेट प्राइस किती?
 

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, पटेल इंजिनीअरिंगचे शेअर्स येत्या काळात चांगली कामगिरी करतील, असा विश्वास प्रोग्रेसिव्ह शेअर्सनं व्यक्त केला आहे. ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की कंपनीच्या शेअर्सची किंमत 99 रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकते.
 

ही कंपनी काय करते?
 

पटेल इंजिनीअरिंग सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी हायड्रो प्रोजेक्ट, धरणं, बोगदे, रस्ते, रेल्वे तयार करते. याशिवाय रिअल इस्टेट व्यवसायात ही कंपनी हात आजमावत आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Patel Engineering Ltd Doubling money in a year shares giving tremendous returns for 3 years Experts are bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.