Paytm Relief : नियमांमध्ये अडकलेल्या पेटीएमला मोठ्या कालावधीनंतर दिलासा मिळाला आहे. पेटीएम ब्रँड चालवणारी मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाली आहे. कंपनी आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन UPI वापरकर्ते जोडू शकते. सुमारे ९ महिन्यांपूर्वी, भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर नवीन UPI वापरकर्ते जोडण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला होता.
पेटीएमचे CEO विजय शेखर शर्मा यांना लिहिले पत्रनॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात एनपीसीआयचे प्रमुख दिलीप आसबे यांनी लिहिले आहे की, कंपनीला नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी दिली जात आहे. ही परवानगी देताना काही अटी व शर्थींचे पालन करावे लागणार आहे. NPCI च्या अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे आणि पेमेंट सर्विस प्रोव्हायडर्सच्या करारांचे पालन करावे लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएमच्या अनेक महिन्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर ही परवानगी दिली आहे.
अटीशर्थींसह परवानगी
पेटीएमने मंगळवारी उशिरा एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने कंपनीला नवीन UPI वापरकर्त्यांना NPCI अटी आणि शर्तींसह मान्यता दिली आहे. हे पत्र कंपनीला २२ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी करण्यात आले होते.
आरबीआयच्या बंदीनंतर शेअर्समध्ये मोठी घसरणकाही महिन्यांपूर्वी आरबीआयने बंदी घातल्यानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. हा कंपनीला मोठा झटका असून यातून कंपनी बाहेर पडणार नाही, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. वास्तविक, शेअर्समधील चढउतारानंतरही पेटीएम कंपनी संघर्ष करत राहिली. अखेर आता NPCI ने परवानी दिल्याने नवीन युजर्स जोडण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे शेअर्स पुन्हा वधारले आहेत.
दुसऱ्या तिमाहीत पेटीएम नफ्यातपेटीएमने नुकतेच आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते, त्यानुसार कंपनीने चांगला नफा कमावला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ९२८.३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील तिमाहीत पेटीएमने ८३८.९ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.