Lokmat Money >शेअर बाजार > Paytm च्या मागचं विघ्न संपेना; आता ही कंपनी विकणार १७५० कोटींचे स्टॉक्स, शेअर्स गडगडले

Paytm च्या मागचं विघ्न संपेना; आता ही कंपनी विकणार १७५० कोटींचे स्टॉक्स, शेअर्स गडगडले

Paytm Share Price Today: एका कंपनीनं हा मोठा निर्णय घेतल्यानतंर कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 01:41 PM2022-11-17T13:41:17+5:302022-11-17T13:41:43+5:30

Paytm Share Price Today: एका कंपनीनं हा मोठा निर्णय घेतल्यानतंर कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले.

paytm share dip 9 percent after japan softbank plan to sell stocks worth rs 1750 crores of payment firm | Paytm च्या मागचं विघ्न संपेना; आता ही कंपनी विकणार १७५० कोटींचे स्टॉक्स, शेअर्स गडगडले

Paytm च्या मागचं विघ्न संपेना; आता ही कंपनी विकणार १७५० कोटींचे स्टॉक्स, शेअर्स गडगडले

Paytm Share Price Today: देशातील आघाडीची पेमेंट सेवा कंपनी पेटीएमला (Paytm) पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. हा झटका सॉफ्ट बँक ग्रुपने दिला आहे. वास्तविक, सॉफ्टबँकने कंपनीतील आपले शेअर्स सुमारे 1750 कोटी रुपयांना विकण्याची तयारी केली आहे. ही बातमी समोर येताच पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. पेटीएमचे शेअर्स तब्बल 9 टक्क्यांनी घसरले.

ब्लॉक डीलच्या बातमीनंतर गुंतवणूकदारांनी पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे शेअर्स विकण्यास सुरुवात केली. जपानी सॉफ्टबँक समूह याद्वारे आपले 2 कोटी 90 लाख शेअर्स विकू शकतो. ही बातमी समोर येताच पेटीएम शेअरच्या शेअर्सच्या किंमतीवर त्याचा परिणाम दिसून आला. शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सेशनमध्येच याच्या किंमतीत 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि बाजार सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासांत शेअर 9.32 टक्क्यांनी घसरला. वृत्त लिहिपर्यंत पेटीएमचे शेअर्स 546.25 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

सॉफ्टबँकचा 4.5 टक्के हिस्सा
BofA सिक्युरिटीजने आपल्या अहवालात सॉफ्टबँक ग्रुपच्या ही निर्णयाची माहिती उघड केली आहे. जपानी समूह पेटीएममधील 4.5 टक्के भागभांडवलाचा व्यवहार करू शकतो, असे यात म्हटले आहे. पेटीएमच्या गुंतवणूकदारांसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जाऊ शकतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा IPO आणणाऱ्या Paytm ची मूळ कंपनी one97 कम्युनिकेशनच्या शेअर बाजारात खराब लिस्टिंग झाल्यामुळे गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागत आहे.

Web Title: paytm share dip 9 percent after japan softbank plan to sell stocks worth rs 1750 crores of payment firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.