Lokmat Money >शेअर बाजार > Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ

Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ

Paytm Share Price : कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १८०० रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:13 AM2024-05-09T09:13:53+5:302024-05-09T09:14:21+5:30

Paytm Share Price : कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १८०० रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागला आहे.

Paytm Share Price All Time Low Time investors ipo huge loss more than 1800 rs share market up down details | Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ

Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ

Paytm Share Price : देशातील मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे (One 97 Communications Ltd) शेअर्स बुधवारी आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट गाठल्यानं शेअरची ३१७.४५ रुपयांपर्यंत घसरली. कंपनीच्या शेअर्सनं सोमवार आणि मंगळवारीही पाच टक्क्यांचा नीचांकी स्तर गाठला होता. 
 

कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १८३२.५५ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दरम्यान, कंपनीचं मार्केट कॅप २०,१८०.४६ कोटी रुपयांवर आलंय. कंपनीच्या प्रमुख कर्ज देणाऱ्या भागीदारांपैकी एक आदित्य बिर्ला फायनान्सनं बँक गॅरंटी कॅश केली आहे. पेटीएमनं ग्राहकांच्या रिपेमेंट डिफॉल्टच्या बदल्यात ही हमी दिली होती.
 

पिरामल फायनान्स आणि क्लिक्स कॅपिटलनंही पेटीएमसोबतच्या भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नुकतीच आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेची सेवा बंद केली होती. यानंतर पेमेंट बँकेचे एमडी आणि सीईओ सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला. शनिवारी कंपनीनं लीडरशीप स्ट्रक्चरमध्ये मोठा फेरबदल करण्याची घोषणा केली. कंपनीच्या वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर यांच्या जागी राकेश सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. राकेश सिंह हे PayU गुंतवणूक असलेली कंपनी फिस्डॉमच्या (Fisdom) ब्रोकिंग सर्व्हिसेसचे प्रमुख होते. २०२१ मध्ये पेटीएमचा १८,३०० कोटी रुपयांचा आयपीओ आला होता. त्याची इश्यू प्राइस २,१५० रुपये होती.
 

किती नुकसान?
 

पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी यात मोठ्या संख्येनं स्वारस्य दाखवलं होतं. परंतु हा शेअर त्याच्या इश्यू प्राइसच्या जवळ पोहोचू शकला नाही. कंपनीचा शेअर ९.३०% च्या डिस्काऊंटसह लिस्ट झाला आणि नंतर २७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला. म्हणजेच लिस्टिंगमध्ये दमदार कमाईची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांची प्रचंड निराशा झाली. पण त्यानंतरही शेअरमध्ये घसरण सुरूच होती. त्याची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ९९८.३० रुपये आहे. गेल्या वर्षी २० ऑक्टोबरला शेअर या पातळीवर पोहोचला होता. आयपीओमध्ये शेअर अलॉट झालेल्या गुंतवणूकदारांनी प्रति शेअर १,८१५.८५ रुपये गमावले आहेत.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Paytm Share Price All Time Low Time investors ipo huge loss more than 1800 rs share market up down details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.