Lokmat Money >शेअर बाजार > Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?

Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?

पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारी शेअरला अपर सर्किट लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 02:58 PM2024-05-11T14:58:56+5:302024-05-11T14:59:17+5:30

पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारी शेअरला अपर सर्किट लागलं.

Paytm share price high Good Days Return investors 13 percent increase in 2 days what do experts sa, what is the target price details | Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?

Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?

Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारी शेअरला अपर सर्किट लागलं. शुक्रवारी अपर सर्किटनंतर बीएसईमध्ये कंपनीचा शेअर ३४९.९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या २ दिवसांत पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत १३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
 

पेटीएमच्या शेअर्समध्ये (Paytm Share Price) वाढ होण्यामागे काही रिपोर्ट्स कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. आदित्य बिर्ला फायनान्स आणि इतर काही कंपन्यांनी पेटीएमच्या लोन गॅरंटीचा वापर केल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. मात्र, पेटीएमनं हे वृत्त फेटाळून लावलं.
 

"आमच्या कर्जदात्यांद्वारे लोन गॅरेंटी लागू करण्याचे दावे चुकीचे आहेत. आमचा वैयक्तिक कर्ज वाटपाचा व्यवसाय विनाअडथळा सुरळीत सुरू आहे,” असं पेटीएमनं जारी निवेदनात सांगितलं.
 

९ मे रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर
 

शुक्रवारी पेटीएमच्या शेअरची किंमत ३४० रुपयांच्या पातळीवर उघडली. काही काळानंतर कंपनीच्या शेअरची किंमत ३४९.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. याआधी ९ मे रोजी पेटीएमचा शेअर कामकाजादरम्यान ३१० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. ही कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. पेटीएमचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९९८.३० रुपये प्रति शेअर आहे.
 

काय म्हणतात तज्ज्ञ?
 

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार प्रवेश गौर (सीनिअर टेक्निकल अॅनालिस्ट) म्हणाले, "पेटीएमचे शेअर्स गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएम सध्या ३०५ ते ३७० रुपयांच्या झोनमध्ये व्यवहार करत आहे. जर हा शेअर ३७० रुपयांच्या वर जाण्यात यशस्वी झाला तर तो ४०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो."
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Paytm share price high Good Days Return investors 13 percent increase in 2 days what do experts sa, what is the target price details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.