Join us  

Paytm Shares Fall: Paytmचे शेअर अजून किती रडवणार...फक्त एका वर्षात गुंतवणुकदार झाले कंगाल; आजचा भाव किती..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 6:43 PM

Paytm Shares Fall: Paytm च्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. लिस्टिंगनंतर आतापर्यंत शेअर्स 70 टक्के घसरले आहेत.

Paytm Share Crash: Paytm च्या शेअर्समध्ये घसरण सुरुच आहे. लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. एका वर्षापूर्वी गुंतवणूकदारांनी मजबूत कमाईच्या आशेने पेटीएमच्या आयपीओमध्ये बक्कळ पैसे गुंतवले, पण वर्षभरातच गुंतवणूकदार कंगाल झाले झाले. आज म्हणजेच बुधवारीही कंपनीचा शेअर 5.6 टक्क्यांच्या घसरणीसह 450च्या पातळीवर आला आहे.

लिस्टिंग झाल्यापासून सतत घसरणदेशात आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा 18,300 कोटींचा IPO घेऊन मार्केटमध्ये उतरणाऱ्या Paytm च्या शेअर्समध्ये लिस्टिंगनंतर सातत्याने घसरण होत आहेत. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्के आणि आज कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरण झाली. कंपनीचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. शेअर आज 450 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. 

10 वर्षांपूर्वी व्यवसाय सुरू केला पेटीएमच्या शेअरची सर्वोच्च पातळी 1873.70 तर सर्वात खालची पातळी 438.35 रुपये प्रति शेअर राहिली आहे.पेटीएम कंपनीने 10 वर्षांपूर्वी मोबाईल रिचार्ज प्लॅटफॉर्म म्हणून आपला व्यवसाय सुरू केला होता. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर पेटीएम पेमेंट सेवेचा व्यवसाय गगनाला भिडला. पण, नंतर इतर स्पर्धक या क्षेत्रात आल्यामुळे कंपनी खाली येऊ लागली.

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक