आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे आज(शुक्रवारी) शेअर बाजारात विक्री दिसली. पण, यात Paytmच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ट्रेडिंगदरम्यान पेटीएम स्टॉक 8 टक्क्यांपर्यंत वाढला. दिवसाच्या अखेरपर्यंत शेअरची किंमत 7.06% वाढून 536.90 रुपयांवर बंद झाली. ब्रोकरेजने येणाऱ्या काळात Paytm च्या शेअरमध्ये वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
कोणत्या ब्रोकरेजने काय म्हटले?
ICICI Securities नुसार Paytm चा शेअर 1,285 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. ब्रोकरेजने या टार्गेट प्राइसचा उल्लेख करत स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. म्हणजेय हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजनुसार, मार्जिनमधील सुधारणेमुळे शेअर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
Goldman Sachs: या परदेशी ब्रोकरेजने पुढील 12 महीन्यांसाठी 1100 रुपयांची टार्गेट प्राइस ठरवली आहे. म्हणजेच येत्या एका वर्षात पेटीएमचा शेअर 1100 रुपयांवर जाऊ शकतो. यासोबतच ब्रोकरेजने स्टॉकला बाय रेटिंग म्हणजेच खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2021 मध्ये आला होता IPO
नोव्हेंबर 2021 मध्ये 18300 कोटी रुपयांचा पेटीएमचा आयपीओ लॉन्च झाला होता. या शेअर्सची किंमत 2080-2150 रुपये प्रति इक्विटी शेअर ठेवण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे शेअर बाजारात IPO ची नोंद झाल्यापासून शेअरची किंमत 2000 रुपयांच्या पातळीलाही पोहोचलेली नाही.