Lokmat Money >शेअर बाजार > Share Market: लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

Share Market: लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

PB Fintech shares price: पीबी फिनटेक लिमिटेडचा ​​शेअर आज बुधवारी फोकसमध्ये राहिला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:37 PM2024-01-31T15:37:33+5:302024-01-31T15:42:44+5:30

PB Fintech shares price: पीबी फिनटेक लिमिटेडचा ​​शेअर आज बुधवारी फोकसमध्ये राहिला.  

PB Fintech Share price 14.6 percent to touch a 52-week high of Rs 1,044.90, read here details  | Share Market: लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

Share Market: लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

PB Fintech shares: पीबी फिनटेक लिमिटेडचा ​​शेअर खरेदी करण्यासाठी बुधवारी गुंतवणूकदारांनी चांगला रस दाखवला. पॉलिसी बाझारची मूळ कंपनी PB Fintech Limited चा शेअर दिवसभर चर्चेत राहिला. कंपनीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. खरं तर PB Fintech चा शेअर १४.६ टक्क्यांनी वाढून १०४४.९० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ डिसेंबरच्या तिमाहीच्या निकालानंतर झाली आहे.

पहिल्यांदाच कंपनीचा शेअर त्याची इश्यू प्राईज ९८० च्या वर पोहचला आहे. कंपनीचा IPO नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच नफ्यात आली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने ३७ कोटी रुपयांचा नफा कमावला. यापूर्वी सप्टेंबर तिमाहीत PB Fintech ला २१.१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. यामध्ये ४३ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ८७१ कोटींच्या घरात पोहचली आहे.

ब्रोकरेजचे मत काय?
दरम्यान, ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने ९६५ रुपयांच्या टार्गेट प्राईजसह आपला अंदाज कायम ठेवला आहे. Macquarie ने ६१० च्या टारगेट प्राईजसह स्टॉकवर आपले कमी कामगिरीचे रेटिंग कायम ठेवले. कंपनीने पैसा बाजारचा विमा घेण्याचा दर आणि महसूल यामध्ये घसरण पाहिली आहे. तसेच पीबी फिनटेकच्या शेअरचा अभ्यास करत असलेल्या १७ विश्लेषकांपैकी १२ जणांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, तर दोन जणांनी स्टॉक होल्ड केल्यास फायदेशीर ठरेल असे मत नोंदवले. याशिवाय तीन जणांनी शेअरची विक्री करण्याचा सल्ला दिला. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: PB Fintech Share price 14.6 percent to touch a 52-week high of Rs 1,044.90, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.