Join us

अवघ्या ₹4 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले ₹9.55 कोटी, कंपनी काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:56 IST

Penny Stock: या शेअरने 95,377 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Penny Stock Return :शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, पण कधी-कधी असा शेअर हाती लागतो, जो अल्प अथवा दीर्घ कालावधीत भरमसाठ परतावा देतो. आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना अविश्वसनीय परतावा दिला आहे. हा स्टॉक गरवारे हायटेक फिल्म्स (Garware Hi-Tech Films) कंपनीचा आहे. या शेअरची किंमत सध्या ₹4,201 आहे, पण 25 वर्षांपूर्वी याची किंमत प्रति शेअर फक्त ₹4.40 होती. या कालावधीत शेअरमध्ये 95,377 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

1 लाखाचे झाले 9.55 कोटी...जर एखाद्या गुंतवणूकदाराने 25 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाखाची गुंतवणूक केली असेल आणि आजपर्यंत ही गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर त्याला ₹ 9.55 कोटी रुपये मिळतील. गरवारे हाय-टेक फिल्म्स लिमिटेड (GHFL) ने अलीकडेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वरील स्टॉक कामगिरीमध्ये प्रचंड अस्थिरता दर्शविली आहे. 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत शेअरची किंमत ₹4,201 वर आहे.

गरवारे हाय-टेक फिल्म्सची कामगिरीएप्रिल-जून तिमाहीत कंपनीने वर्ष-दर-वर्ष (Y-o-Y) करानंतरच्या नफ्यात (PAT) मजबूत 102.2% वाढ नोंदवली आहे. कंपनीने Q1FY24 मध्ये ₹43.7 कोटी नफा नोंदवला आहे. SCF आणि PPF व्यवसायातील सतत वाढीमुळे महसूल वार्षिक 25 टक्क्यांनी वाढून ₹474.50 कोटी झाला. EBITDA मध्ये 78.7 टक्के वार्षिक वाढ आणि QoQ मध्ये 44.9 टक्के, ₹130 कोटी पोहोचली आहे.

कंपनी काय करते?कंपनी सोलर कंट्रोल फिल्म्स (SCF), पेंट प्रोटेक्शन फिल्म्स (PPF) आणि इतर स्पेशॅलिटी पॉलिस्टर फिल्मची निर्मिती करते. देशातील एकमेव सोलर कंट्रोल विंडो फिल्म्सची निर्माता आहे. तसेच, कदाचित सौर कंट्रोल विंडो फिल्म मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या आणि घटकांच्या उत्पादनासाठी जागतिक स्तरावरील एकमेव कंपनी आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक