Share Market Investment : शेअर बाजारात अनेक असे शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. तर अनेक शेअर्सनं गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. याशिवाय काही गुंतवणूकदार असे असतात जे सतत पेनी शेअर्समध्ये आपला मल्टिबॅगर शोधत असतात. काही पेनी शेअर्स सतत चर्चेत असतात, त्यापैकीच एक म्हणजे जीव्हीके पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला गेल्या १४ दिवसांपासून अपर सर्किट लागत आहे. १४ दिवसांत या शेअरची किंमत ४.७१ रुपयांवरून ६.०१ रुपयांवर पोहोचली आहे.
जीव्हीके पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रामुख्याने वीज प्रकल्प, विमानतळ आणि पायाभूत सुविधा कंपन्यांच्या मालकांना ऑपरेटिंग आणि मेंटेनन्स सेवा, मनुष्यबळ आणि सल्लागार सेवा, तसंच आपत्कालीन सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. जीव्हीके पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सला अपर सर्किट लागल्यानं हे शेअर्स चर्चेत आहेत.
आजच्या व्यवहाराच्या सत्राच्या सुरुवातीला जीव्हीके पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर बीएसईवर कालच्या ६.०७ रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत ६.१९ रुपयांवर उघडला. कंपनीचे सध्याचं बाजार भांडवल ९७७.५३ कोटी रुपये आहे.
आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीच्या तिमाही निकालांनुसार, कंपनीनं ऑपरेटिंगमधून २२३.९५ कोटी रुपये उत्पन्न नोंदवलं आहे, जे मागील कालावधीत ४९७.१७ कोटी रुपये होतं. कंपनीचा ऑपरेटिंग नफा ७९.५२ टक्के मार्जिनसह ४४९.७० कोटीच्या तुलनेत १७८.०९ कोटी रुपये झालाय.