Join us  

₹2 च्या शेअरची कमाला, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! एकाच दिवसात 13% वधारला, खरेदीसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 5:59 PM

या शेअरमध्ये मंगळवारी 13% हून अधिकची तेजी दिसून आली आहे.

खरे तर पेनी स्टॉकमधील गुंतवणूक ही धोकादायक मानली जाते. मात्र, बाजारात असेही काही दर्जेदार शेअर्स आहेत, जे गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. अशाच एका शेअरने फार कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. ज्या शेअरसंदर्भात आम्ही बोलत आहोत, त्या शएअरचे नाव आहे एवेक्सिया लाइफकेअर (Evexia Lifecare Ltd). या शेअरमध्ये मंगळवारी 13% हून अधिकची तेजी दिसून आली आहे. हा शेअर आज ₹2.47 च्या इंट्राडे हायवर पोहोचला आहे. 

अशी आहे शेअरची स्थिती - एवेक्सिया लाइफकेअर लिमिटेडचा शेअर गेल्या अनेक सत्रांपासून सतत्याने फोकसमध्ये आहे. हा स्टॉक गेल्या एका महिन्यात 23% ने वाढला आहे. तर एका वर्षात या शेअरने 75% पर्यंत दिला आहे. मात्र दीर्घ मुदतीचा विचार करता, या शेअरने नकारात्मक परतावा दिला आहे. कारण 2020 मध्ये हा शेअर 20 रुपयांच्या जवळपास पोहोचला होता. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3.15 रुपये एवढा आहे. हा उच्चांक त्याने 15 मे 2023 रोजी गाठला होता. तसेच या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 1.30 रुपये (3 फेब्रुवारी 2023) एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीचे मार्केट कॅप हे 156.14 कोटी रुपये एवढे आहे. 

या कंपनीची स्थापना रबर, चामडे, शाई आणि पेंट उद्योगासारख्या औद्योगिक कामांसाठी विशेष तेल, प्रोट्रोलियम सल्फोनेट्स सॉल्वँट्स यांसारख्या पेट्रोकेमिकल डाउनस्ट्रीम उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात आली होती. गुजरातमधील टुंडव गावाच्या हद्दीत आठ एकर भूखंडावर कंपनीचा एक अपडेटेड प्रोसेसिंग प्लांट आहे. एवेक्सिया लाइफकेअर लिमिटेडचे जयेश रायचंदभाई ठक्कर, हसमुखभाई धनजीभाई ठक्कर आदी असे एकूण चार संचालक आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक