Join us

'या' पेनी स्टॉकने पुन्हा वेग पकडला, लागले अप्पर सर्किट; किंमत 10 रुपयांपेक्षा कमी ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:24 IST

Penny Stocks: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांमध्ये पेनी स्टॉक लोकप्रिय असतात.

Penny Stocks: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांमध्ये पेनी स्टॉक खूप लोकप्रिय असतात. याचे कारण म्हणजे, त्यांच्या किमती तर कमी असतातच, शिवाय नफ्याची क्षमताही जास्त असते. असाच एक पेनी स्टॉक SRU Steels Limited चा आहे. या पेनी स्टॉकने सध्या वेग पकडला असून, गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागले..

SRU Steels Limited ही स्टेनलेस स्टील उत्पादन व्यवसायातील कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 1995 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचे 2010 मध्ये SRU स्टील्स लिमिटेड म्हणून पुनर्ब्रँडिंग झाले. 13 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारणी योजनेवर चर्चा केली जाईल, असे कंपनीच्या घोषणेमुळे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

ही रक्कम वेगवेगळ्या प्रकारे उभारली जाऊ शकते, जसे की इक्विटी शेअर्स, परिवर्तनीय साधने आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट्स (GDR). SRU स्टील्स लिमिटेडने 47.95 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. यासाठी कंपनी 4:1 च्या प्रमाणात राइट इश्यू अंतर्गत प्रत्येकी 10 रुपयांचे 47,951,400 इक्विटी शेअर जारी करेल.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात 103% वाढFY24 मध्ये कंपनीने 9.16 कोटी रुपये कमावले. वर्ष-दर-वर्षाशी तुलना केल्यास, यात 489.76% वाढ झाली आहे. EBITDA मध्ये थोडीशी घसरण दिसून आली. तर, कंपनीचा निव्वळ नफा (PAT) 103% ने वाढून ₹0.07 कोटी झाला आहे. सध्या कंपनीचा शेअर्स 15.20 च्या 52 आठवड्यांच्या शिखरापेक्षा 47% कमी आहे. सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीचे शेअर्स 15 रुपयांच्या वर गेले होते. पण, ऑक्टोबर 2024 च्या लोअर सर्किटपासून स्टॉक 41% वाढला आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार