हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचा (HCC) शेअर बुधवारी दिवसभरातील व्यवहारात 20 टक्क्यांनी वधारून 24.15 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा पाच वर्षांतील उच्चांक आहे. हा शेअर मे 2018 नंतर आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत हा शेअर 80 टक्क्यांपर्यंत वधारला आहे.
निधी उभारण्यासाठी मिळाली मंजुरी -
बुधवारच्या व्यापारात काउंटरवरील सरासरी ट्रेडिंग जवळजवळ दुप्पट झाली आहे. जवळपास 215 मिलियन इक्विटी शेअर अर्थात 14 टक्के शेअर एनएसई आणि बीएसईवर बदलले आहेत. 3 ऑगस्टला, एचसीसीच्या बोर्डाने नियामक मान्यतेच्या अधीन राहून राइट इश्यूद्वारे 300 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
जून तिमाहीतील परिणाम -
जून तिमाहीसाठी (Q1FY24) एचसीसीने 52.70 कोटी रुपयांचा एकत्रित नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षापूर्वी 280.70 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा एकत्रित महसूल देखील 15 टक्क्यांनी वाढून Q1FY24 मध्ये 2,564.8 कोटी रुपये झाला आहे. जो Q1FY23 मध्ये 2,228.9 कोटी रुपये होता. 30 जून 2023 पर्यंत कंपनीची ऑर्डर बुक 13,568 कोटी रुपये होती. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत, जम्मू आणि काश्मीरमधील अंजी खाड्ड रेल्वे ब्रिज प्रकल्पाचा अंतिम टप्प लाँच करण्यात आला. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)