Lokmat Money >शेअर बाजार > 17 रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; मुकेश अंबानींची आहे कंपनी!

17 रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; मुकेश अंबानींची आहे कंपनी!

1 जुलै 2022 रोजी या शेअरचा भाव 22.50 रुपयांवर होता. हा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 10.07 रुपये एवढी होती. हा 52 आठवड्यांतील निचांक होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 04:28 PM2023-06-19T16:28:50+5:302023-06-19T16:30:25+5:30

1 जुलै 2022 रोजी या शेअरचा भाव 22.50 रुपयांवर होता. हा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 10.07 रुपये एवढी होती. हा 52 आठवड्यांतील निचांक होता.

People flock to buy Mukesh Ambani's textile firm Alok industries share at Rs 17 | 17 रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; मुकेश अंबानींची आहे कंपनी!

17 रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; मुकेश अंबानींची आहे कंपनी!

टेक्सटाइल क्षेत्रात काम करणारी कंपनी आलोक इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये (Alok Industries Ltd) सातत्याने तेजी दिसून येत आहे. गेल्या एका आठवड्यात हा शेअर बीएसई इंडेक्सच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वधारला आहे. आठवड्यातील पहिल्या कामकाजाच्या दिवसात म्हणजेच सोमवारी ट्रेडिंगदरम्यान या शेअरमध्ये जवळपास 13 टक्क्यांची तेजी दिसून आली असून शेअरचा दर 17.59 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

1 जुलै 2022 रोजी या शेअरचा भाव 22.50 रुपयांवर होता. हा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 10.07 रुपये एवढी होती. हा 52 आठवड्यांतील निचांक होता.

केव्हा किती परतावा मिळाला -
आलोक इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यांच्या काळात 31 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. हा शेअर गेल्या एका महिन्यात 25 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. मात्र, तीन वर्ष, दोन वर्ष आणि एका वर्षाच्या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह परतावा दिला आहे.

मार्च तिमाहीमध्ये आलोक इंडस्ट्रीजची शुद्ध विक्री एक वर्षापूर्वीच्या समान तिमाहीच्या तुलनेत 22 टक्क्यांहून अधिकने घसरून 1561.50 कोटींवर आली आहे. कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 297.55 कोटी रुपयांचा घाटा नोंदवला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत EBITDA ची स्थर 61.23 कोटी रुपये होता. 31 मार्चला संपलेल्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनीत 75 टक्क्ये एवढी हिस्सेदारी होती. रिलायन्स इंडस्ट्रीज ही मुकेश अंबानी यांची कंपनी आहे. आलोक इंडस्ट्रीज ही कापड उद्योगाशी संबंधित कंपनी आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: People flock to buy Mukesh Ambani's textile firm Alok industries share at Rs 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.