Join us  

Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 9:49 AM

Piccadily Agro Industries Ltd : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरनं मात्र गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे.

Piccadily Agro Industries Ltd : शेअर बाजारामध्ये सध्या जोरदार तेजी आहे. फेड रिझर्व्हनं व्याजदरात कपात केल्यानंतर येत्या काही दिवसांत आणखी तेजी दिसून येऊ शकते. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी एका वर्षात गुंतवणूक दुप्पटही केलीये. तर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी केवळ ६ महिन्यांत दुप्पट परतावा दिला आहे. काही शेअर्सनं अल्पावधीतच गुंतवणूकदारांना जवळपास कोट्यधीश बनवलंय. यामध्ये एका मद्य तयार करणाऱ्या कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना अतिशय कमी कालावधीत श्रीमंत केलंय. Piccadily Agro Industries Ltd असं या कंपनीचं नाव आहे.

मिळाला जबरदस्त रिटर्न

या कंपनीच्या शेअरनं ६ महिन्यांत गुंतवणूकदारांच्या रकमेत दीडपटीने वाढ केली आहे. ६ महिन्यांपूर्वी त्याच्या शेअरची किंमत ३०० रुपये होती. सध्या याची किंमत ७७४.७० रुपये आहे. अशा तऱ्हेने ६ महिन्यांत गुंतवणूकदारांना सुमारे १५८ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स १ लाख रुपयांना खरेदी केले असते तर आज त्यांची किंमत २.५८ लाख रुपये झाली असती. म्हणजेच ६ महिन्यांत तुम्हाला १.५८ लाख रुपये मिळाले असते.

वर्षभरात जबरदस्त परतावा

या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना वर्षभरात ६०० टक्क्यांहून अधिक होता. वर्षभरापूर्वी त्याच्या शेअरची किंमत १०३ रुपयांच्या आसपास होती. अशा तऱ्हेनं वर्षभरात सुमारे ६५२ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी यात १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्याकडे ७.५२ लाख रुपये असते. म्हणजे तुम्हाला वर्षभरात ६.५२ लाख रुपयांचा नफा झाला असता.

५ वर्षांत केलं कोट्यधीश

५ वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत ८ रुपये होती. त्यावेळी तुम्ही त्यात १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्या एक लाखाचं मूल्य जवळपास १ कोटी (९६.२४ लाख रुपये) झालं असतं. म्हणजेच तुम्ही कोट्यधीश झाला असता.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक