केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यांपैकी एक म्हणजे पीएम ई-बस सेवा. 57,613 कोटी रुपयांच्या PM ई-बस सेवेअंतर्गत 10,000 नव्या इलेक्ट्रिक बस चालविण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. देशातील 100 शहरांमध्ये या बसेसची ट्रायल घेण्यात येईल. महत्वाचे म्हणजे, मोदी सरकारने यासंदर्भात घोषणा केल्यानंतर, इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी JBM Auto चा शेअर रॉकेट बनला आहे. काल शेअर बाजार बंद होताना कंपनीच्या शेअरने 12 टक्क्यांची उसळी घेतली आहे.
सरकारच्या निर्णयाचा परिणाम -
सरकारच्या या निर्णयानंतर, इलेक्ट्रिक बस आणि याच्याशी संबंधित उपकरणे तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये अचानकपणे तेजी दिसून आली आहे. सर्वात पहिले जेबीएम ऑटो लिमिटेडसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर (JBM Auto Ltd Share) सरकारच्या घोषणेनंतर, बुधवारी 12 टक्क्यांची उसळी घेत 1474 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र शेअर बाजार बंद होताना तो 9.60 टक्के अथवा 125.90 रुपयांची उसळी घेत 1,437.00 रुपयांवर बंद झाला.
काय काम करते JBM ऑटो? -
जेबीएम ऑटो लिमिटेडने 2018 मध्ये इलेक्ट्रिक बस (Electric Buses) तयार करण्याच्या क्षेत्रात पाय ठेवला आणि देशभरात ईव्ही चार्जिंग स्टेशन (EV Charging Stations) स्थापन करत आहे. या कंपनीने आतापर्यंत 1,000 हून अधिक बसेसचे वितरण केले आहे. तसेच 110 हून अधिक फास्ट चार्जर्स लावले आहेत. या कंपनीने आतापर्यंत ईव्ही प्रोजेक्ट्समध्ये 800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, आपल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेचा विस्तार करण्यासाठी पुढील तीन वर्षांत 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्लॅन तयार केला आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तुफान तेजी -
सरकारच्या या योजनेचा परिणाम केवळ JBN Auto Stock वरच नाही, तर या क्षेत्रात काम करणाऱ्या ओलेक्ट्री ग्रीनटेक लिमिटेड (Olectra Greentech Ltd) च्या शेअरवरही दिसून आला. ओलेक्ट्राचा शेअरही बुधवारी 9 टक्क्यांच्या उसळीसह 1,224.90 रुपयांवर पोहोचला होता.