Join us  

PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 1:31 PM

PN Gadgil Jewellers Listing : या आठवड्यातही शेअर बाजारात आयपीओंची धमाकेदार लिस्टिंग सुरू आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सची सोमवारी लिस्टिंग झाल्यानंतर पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ मंगळवारी लिस्ट झाला.

PN Gadgil Jewellers Listing : या आठवड्यातही शेअर बाजारात आयपीओंची धमाकेदार लिस्टिंग सुरू आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सची सोमवारी लिस्टिंग झाल्यानंतर पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ मंगळवारी लिस्ट झाला. लिस्टिंगवर गुंतवणूकदारांना प्रचंड नफा झाला. बीएसईवर ७३.७५ टक्के प्रीमियमसह ८३४ रुपये आणि एनएसईवर ७२.९१ टक्के प्रीमियमसह ८३० रुपयांवर शेअर लिस्ट झाला. 

आयपीओदरम्यान याचा भाव ४८० रुपये होता. अशा तऱ्हेने लिस्टिंगमध्येच गुंतवणूकदारांना ३५० रुपयांचा फायदा झाला. मात्र, लिस्टिंगनंतर त्यात थोडी घसरण दिसून आली. ११०० कोटी रुपयांच्या इश्यू साईजचा हा आयपीओ १० सप्टेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता.

किती मिळालेलं सबस्क्रिप्शन?

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ एकूण ५९ पट सब्सक्राइब झाला होता. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स जानेवारी २०२४ पर्यंत स्टोअर काऊंटच्या बाबतीत महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष २०२२-२०२३ दरम्यान च्या महसुली वाढीच्या आधारावर, कंपनी भारतातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपन्यांमध्ये सर्वात वेगानं वाढणारा ज्वेलरी ब्रँड आहे. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट (पूर्वीचं एडलवाइज सिक्युरिटीज) आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स हे या इश्यूचे लीड मॅनेजर आहेत.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार