शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. तर असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. दरम्यान, मॉर्गन स्टॅनलीनं पीएनबी हाउसिंग फायनान्सच्या शेअर्सची टार्गेट प्राईज 970 रुपये केली आहे. तसंच स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग दिलंय. या ताज्या अपडेटनंतर, आज म्हणजेच 1 एप्रिल रोजी, PNB हाउसिंग फायनान्सचे शेअर्स 13 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. सकाळी हा शेअर 651 रुपयांवर उघडला आणि काही वेळातच 721 रुपयांवर पोहोचला.
नवीन टार्गेट प्राइस आणि रेटिंग ठरवल्यानंतर बराच काळ सुस्त पडलेल्या या शेअरमध्ये तेजी आणण्यास मदत केली आहे. यावर्षी आतापर्यंत यात 9 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरनं निगेटिव्ह परतावा दिला आहे. परंतु, गेल्या वर्षभरात त्यात 58 टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.
केअर रेटिंग आणि ICRA ने कंपनीच्या असेट्सच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे दीर्घकालीन रेटिंग 'AA+' वर अपग्रेड केलंय. ICRA नं कंपनीचं डेट इन्स्ट्रुमेंट रेटिंग 'ICRA AA (Positive)' वरून 'ICRA AA+ (स्टेबल)' वर अपग्रेड केलं आहे. तसंच 'ओव्हरवेट' कॉल कायम ठेवला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)