Join us  

P N Gadgil ज्वेलर्सच्या IPO ला तुफान प्रतिसाद, आयपीओ लागला का नाही? 'असं' करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 1:27 PM

PNG IPO Allotment Status : पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ काल बंद झाला. कंपनीच्या शेअर्सचं वाटप आज निश्चित होण्याची शक्यता आहे. पाहा कसं करू शकता स्टेटस चेक.

PNG IPO Allotment Status : पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ काल बंद झाला. कंपनीच्या शेअर्सचं वाटप आज निश्चित होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना लॉटरी तत्त्वावर शेअर्स मिळतील आणि संपूर्ण प्रक्रियेवर निबंधक लक्ष ठेवतील. अर्जदार बीएसईद्वारे किंवा रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर जाऊन अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात.

अलॉटमेंट स्टेटस (PNG IPO Allotment Status)

जर तुम्ही पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर आपण बीएसई किंवा रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • स्टेप १: बीएसई वेबसाइटला भेट द्या
  • (https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx) 
  • स्टेप २: कृपया ड्रॉप डाउनमध्ये इश्यूचं नाव, म्हणजेच कंपनीचे नाव निवडा.
  • स्टेप ३: अलॉटमेंट स्टेटस तपासण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर किंवा पॅन नंबर टाका. 

रजिस्ट्रारच्या वेबसाईटवही चेक करू शकता

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स हे बिगशेअर सर्व्हिसेसच्या आयपीओचे रजिस्ट्रार आहेत. तुम्ही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. या ठिकाणी स्टेटस चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • स्टेप १: इनटाइम इंडिया वेबसाइटला भेट द्या
  • (https://www.bigshareonline.com/ipo_Allotment.html) 
  • स्टेप २: पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ सिलेक्ट करा 
  • स्टेप ३: पॅन डिटेल्स एन्टर करा आणि स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्चवर क्लिक करा.

केव्हा होणार लिस्ट? (PNG Listing Date)

पु.ना.गाडगीळचे शेअर्स शेअर बाजारात १७ सप्टेंबरला लिस्ट होण्याची शक्यता आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा जीएमपी ३३३ रुपये आहे. जो सध्याच्या किंमतीपेक्षा ७० टक्क्यांनी अधिक आहे.

किती मिळालेलं सबस्क्रिप्शन?

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ एकूण ५९ पट सब्सक्राइब झाला होता. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स जानेवारी २०२४ पर्यंत स्टोअर काऊंटच्या बाबतीत महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष २०२२-२०२३ दरम्यान च्या महसुली वाढीच्या आधारावर, कंपनी भारतातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपन्यांमध्ये सर्वात वेगानं वाढणारा ज्वेलरी ब्रँड आहे. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट (पूर्वीचं एडलवाइज सिक्युरिटीज) आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स हे या इश्यूचे लीड मॅनेजर आहेत.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार