Lokmat Money >शेअर बाजार > Gopal Snacks IPO चं खराब लिस्टिंग, ₹४०१ चा शेअर ₹३५१ वर झाला लिस्ट; गुंतवणूकदारांचं नुकसान

Gopal Snacks IPO चं खराब लिस्टिंग, ₹४०१ चा शेअर ₹३५१ वर झाला लिस्ट; गुंतवणूकदारांचं नुकसान

नमकीन कंपनी गोपाल स्नॅक्सच्या शेअर्सची आज शेअर बाजारात फिकी एन्ट्री झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:48 AM2024-03-14T10:48:22+5:302024-03-14T10:49:24+5:30

नमकीन कंपनी गोपाल स्नॅक्सच्या शेअर्सची आज शेअर बाजारात फिकी एन्ट्री झाली.

Poor listing of Gopal Snacks IPO rs 401 share listed at rs 351 Loss of investors details | Gopal Snacks IPO चं खराब लिस्टिंग, ₹४०१ चा शेअर ₹३५१ वर झाला लिस्ट; गुंतवणूकदारांचं नुकसान

Gopal Snacks IPO चं खराब लिस्टिंग, ₹४०१ चा शेअर ₹३५१ वर झाला लिस्ट; गुंतवणूकदारांचं नुकसान

Gopal Snacks IPO Listing: नमकीन कंपनी गोपाल स्नॅक्सच्या (Gopal Snacks) शेअर्सची आज शेअर बाजारात फिकी एन्ट्री झाली. कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि तो एकूण 9 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता. आयपीओ अंतर्गत, 401 रुपये किमतीला शेअर्स जारी करण्यात आले. परंतु आज हा शेअर बीएसईवर 350 रुपये आणि एनएसईवर 351 रुपयांवर लिस्ट झाला. याचा अर्थ आयपीओच्या गुंतवणूकदारांना कोणताही लिस्टिंग गेन मिळाला नाही पण 12.71 टक्के तोटा सहन करावा लागला. मात्र, यानंतर शेअर्स पुन्हा सावरले. कामकाजादरम्यान त्यांनी 380 रुपयांची पातळी (Gopal Snacks Share Price) ओलांडली. मात्र, कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअर 38 रुपयांच्या सवलतीत मिळाल्याने त्यांना मात्र नफा झालाय.
 

मिळालेला जोरदार प्रतिसाद
 

गोपाल स्नॅक्सचा 650 कोटी रुपयांचा IPO 6 ते 11 मार्चपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि एकूणच तो 9.50 पट सबस्क्राइब झाला. यामध्ये, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा (QIB) 18.42 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा (NII) 10.00 पट, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हिस्सा 4.22 पट, तसंच कर्मचाऱ्यांसाठीचा हिस्सा 7.27 पट सबस्क्राईब झाला होता. या आयपीओ अंतर्गत, ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत 1 ची फेस व्हॅल्यू असलेले 1,62,09,476 शेअर्स विकले गेले आहेत. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना मिळतील.
 

कंपनीच्या बाबत माहिती
 

गोपाल स्नॅक्स (गोपाल नमकीन) 1999 मध्ये सुरू करण्यात आली असून ते एथनिक आणि वेस्टर्न नमकीन विकते. जगातील अनेक देशांमध्ये त्याची उत्पादनं विकली जातात. त्यांची सहा उत्पादन युनिट्स आहेत त्यापैकी तीन प्रायमरी आहेत आणि उर्वरित तीन एंसिलरी आहेत. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम आहे.
 

आर्थिक वर्ष 2021 मध्ये, कंपनीचा निव्वळ नफा 21.12 कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2022 मध्ये 41.54 कोटी रुपये आणि नंतर आर्थिक वर्ष 2023 मध्ये 112.37 कोटी रुपयांवर गेला. या कालावधीत, कंपनीचा महसूल वार्षिक 11 टक्क्यांहून अधिक चक्रवाढ दरानं (CAGR) वाढून 1,398.54 कोटी रुपये झाला. चालू आर्थिक वर्ष 2023-24 बद्दल बोलायचे झाल्यास, एप्रिल-सप्टेंबर 2023 च्या पहिल्या सहामाहीत, कंपनीनं 55.57 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि 677.97 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Poor listing of Gopal Snacks IPO rs 401 share listed at rs 351 Loss of investors details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.