Lokmat Money >शेअर बाजार > अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा

अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा

Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते. यामध्ये सरकारकडून तुमच्या पैशांवरील सुरक्षेची हमी दिली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजना चालवल्या जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:47 PM2024-09-24T12:47:07+5:302024-09-24T12:51:29+5:30

Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते. यामध्ये सरकारकडून तुमच्या पैशांवरील सुरक्षेची हमी दिली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजना चालवल्या जातात.

post office fd scheme will pay more interest rs 3000000 on an investment of rs 1000000 Just use one trick details | अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा

अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा

Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमधीलगुंतवणूकही सुरक्षित मानली जाते. यामध्ये सरकारकडून तुमच्या पैशांवरील सुरक्षेची हमी दिली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजना चालवल्या जातात, परंतु आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटबद्दल सांगणार आहोत, ज्याला सामान्य भाषेत आपण पोस्ट ऑफिस एफडी म्हणतो. पोस्ट ऑफिसमध्ये बँकेप्रमाणे वेगवेगळ्या मुदतीच्या एफडीचे पर्याय उपलब्ध आहेत. ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. तसंच आयकर कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. अशावेळी जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही तुमची रक्कम तीन पटीनं कमावू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करावं लागेल.

पोस्ट ऑफिसमध्ये तुमची रक्कम तिप्पट करण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांची एफडी निवडावी लागेल. आपल्याला या योजनेत गुंतवणूक करावी लागेल आणि ती मॅच्युअर होण्यापूर्वी त्याची मुदत वाढवावी लागेल. हे एक्सटेन्शन तुम्हाला सलग २ वेळा करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला ही एफडी १५ वर्षे चालवावी लागेल. जर तुम्ही या एफडीमध्ये १० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ७.५ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात या रकमेवर ४,४९,९४८ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे एकूण रक्कम १४,४९,९४८ रुपये होईल.

जर तुम्ही या स्कीम ५ वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला फक्त व्याज म्हणून ११,०२,३४९ रुपये मिळतील आणि १० वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम २१,०२,३४९ रुपये होईल. ही स्कीम मॅच्युअर होण्यापूर्वी आपल्याला ते आणखी एकदा वाढवावी लागेल. १५ व्या वर्षी तुम्हाला १० लाखांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याज म्हणून २०,४८,२९७ रुपये मिळतील. यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर ३०,४८,२९७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुद्दलापेक्षा दुप्पट व्याज मिळेल आणि तुमची रक्कम तिप्पट होईल.

मुदतवाढीचे नियम काय?

मॅच्युरिटीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत १ वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी, मॅच्युरिटी पीरियडच्या १२ महिन्यांच्या आत २ वर्षांची एफडी आणि मॅच्युरिटी पीरियडच्या १८ महिन्यांच्या आत ३ आणि ५ वर्षांच्या एफडीला मुदतवाढ दिली जाऊ शकते. याशिवाय खातं उघडताना मॅच्युरिटीनंतर अकाऊंट एक्सटेन्शनची विनंतीही करू शकता. मुदतपूर्तीच्या दिवशी संबंधित खात्यावर लागू होणारा व्याजदर वाढीव कालावधीवर लागू होईल.

Web Title: post office fd scheme will pay more interest rs 3000000 on an investment of rs 1000000 Just use one trick details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.