Join us  

'या' IPO ने मिळवून दिला जबरदस्त नफा! 5 दिवसात कमावले दुप्पट पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 6:28 PM

Premier Energies Share price : प्रीमिअर एनर्जीचा आयपीओ घेणाऱ्यांची चांगलीच कमाई झाली आहे. कारण शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर हा शेअर आयपीओ किंमतीच्या तुलनेत तब्बल १६४ टक्क्यांनी वाढला आहे.

Premier Energies Share Update : प्रीमिअर एनर्जीच्या आयपीओची शेअर बाजारात दणदणीत लिस्टिंग झाली आहे. ३ सप्टेंबर रोजी लिस्टिंग झाल्यापासून मूळ आयपीओ किंमती तुलनेत हा शेअर १६४ टक्क्यांनी वाढला असून, ज्यांना आयपीओ लागला, त्यांची चांगलीच कमाई झाली आहे. कारण पाच दिवसांतच दुप्पट पैसे कमावले आहे. 

शेअर बाजारात Premier Energies चा आयपीओ १२० टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्ट झाला होता. म्हणजे ज्यांना हा आयपीओ लागला, त्यांचे पैसे लिस्टिंग होताच दुप्पट झाले. कंपनीचा शेअर आयपीओ किंमतीपेक्षा १२० टक्क्यांनी जास्त लिस्ट झाले. म्हणजे शेअरची आयपीओ किंमत ४५० रुपये होती. हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ९९१ रुपयांवर लिस्ट झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ९९० रुपयांवर लिस्ट झाला होता. 

Premier Energies IPO : एका आठवड्यात १६४ टक्यांची वाढ

Premier Energies शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर स्टॉक ठरला आहे. सोमवारी Premier Energies शेअर १०.२७ टक्क्यांनी वाढून १२१९ रुपयांवर बंद झाला. गुरुवारी हा शेअर ११०५ रुपयांवर सुरू झाला होता आणि १२३५ रुपयांवर पोहोचला होता. आयपीओ किंमतीशी तुलना केली, तर हा शेअर १६४ टक्क्यांनी वाढला आहे. आयपीओ इश्यू प्राईस प्रति शेअर ४५० रुपये होती. एका आठवड्यात १२०० रुपयांवर गेली आहे. 

Premier Energies 'आयपीओ'ला मिळाला जबरदस्त प्रतिसाद

Premier Energies च्या आयपीओची साइज २८३०.४० कोटी रुपयांची होती आणि गुंतवणूकदारांसाठी २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट पर्यंत आयपीओ खुला होता. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने १ रुपया फेसव्हॅल्यू असलेल्या ६२,८९७,७७७ शेअरसाठी बोली लावली होती. आयपीओ ओपन झाल्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत ७४ टक्के सबस्क्रिप्शन झाले होते.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक