Join us  

११६% प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO; गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होण्याचे संकेत, उद्या लिस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 4:15 PM

Premier Energies IPO: कंपनीचा शेअर ४५० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडपेक्षा ११६ टक्क्यांनी अधिक म्हणजे ९७५ रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्याचा कल असाच कायम राहिल्यास लिस्टिंगच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी गुंतवणूकदारांची पैसे दुप्पट होतील, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

Premier Energies IPO:  प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या शेअर्सना ग्रे मार्केट म्हणजेच अनलिस्टेड मार्केटमध्ये प्रचंड मागणी दिसून येत आहे. कंपनीचा शेअर ४५० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडपेक्षा ११६ टक्क्यांनी अधिक म्हणजे ९७५ रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्याचा कल असाच कायम राहिल्यास लिस्टिंगच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी गुंतवणूकदारांची पैसे दुप्पट होतील, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. हा आयपीओ २७ ऑगस्ट रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि २९ ऑगस्टपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला होता.

काय म्हणतात तज्ज्ञ?

स्टॉक्सबॉक्सच्या आकृति मेहरोत्रा यांनी प्रीमियर एनर्जी बाजारात दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं. ११०% ते १२०% प्रीमियमसह लिस्ट होण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी आपले शेअर्स होल्ड करण्याचा विचार करावा असंही त्या म्हणाल्या.

गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखेरच्या दिवशी हा आयपी ७४.३८ पट सबस्क्राइब झाला. सोलर सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्रीमियर एनर्जीजचा आयपीओ दुसऱ्या दिवशी ६.६० पट सब्सक्राइब झाला होता. एनएसईकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, २,८३० कोटी रुपयांच्या प्रारंभिक शेअर्स विक्रीत ४,४६,४०,८२५ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत २९,४८,४५,३६४ शेअर्ससाठी अर्ज मिळाले.

नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (एनआयआय) हिस्सा १८.८३ पट, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (आरआयआय) हिस्सा ४.२१ पट सब्सक्राइब झाला. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (क्यूआयबी) हिस्सा १.४० पट सब्सक्राइब झाला होता.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक