Lokmat Money >शेअर बाजार > Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता

Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता

Premier Energies IPO: प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दमदार सब्सक्रिप्शनसह बंद झाला आहे. इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांचाही या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 09:18 AM2024-08-31T09:18:50+5:302024-08-31T09:19:13+5:30

Premier Energies IPO: प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दमदार सब्सक्रिप्शनसह बंद झाला आहे. इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांचाही या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय.

Premier Energies IPO Tremendous Response from Investor Chances of bumper profit on the first day itself bse nse grey market premium listing | Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता

Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता

Premier Energies IPO: प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा (Premier Energies) आयपीओ दमदार सब्सक्रिप्शनसह बंद झाला आहे. इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर २,८३१ कोटी रुपयांच्या या आयपीओला जवळपास ७५ पट सबस्क्रिप्शन मिळालं. आयपीओसाठी अर्ज करण्याची २९ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख होती. ३ सप्टेंबर रोजी प्रीमियर एनर्जीजचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

QIB कोटा २१६.६७ पट सब्सक्राइब 

प्रीमियर एनर्जीजच्या आयपीओमध्ये इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी १,२२,८९,२२७ शेअर्स राखीव ठेवण्यात आले असून या श्रेणीतील एकूण २,६६,२७,११,४९१ शेअर्सठी अर्ज प्राप्त झाले आहेत. या श्रेणीत एकूण २१६.६७ पट सबस्क्रिप्शन मिळालंय. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी ९६,३१,४०६ शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते, यासाठी ४८,१९,७३,२५० शेअर्ससाठी अर्ज मिळाले आहेत. ही श्रेणी ५०.०४ पट सब्सक्राइब झाली आहे. 

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २ कोटी २४ लाख ७३ हजार २७९ शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते. मात्र यासाठी १७ कोटी २७ लाख ५४ हजार ४७२ शेअर्ससाठी अर्ज मिळाले आहेत. ही कॅटेगरी ७.६९ पट सब्सक्राइब करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोटा ११.४३ पट सबस्क्राइब झाला.

काय आहे प्राईज बँड?

प्रीमिअर एनर्जीज लिमिटेडनं आयपीओच्या माध्यमातून २,८३१ कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, त्यापैकी १,२९१.४ कोटी रुपये फ्रेश इश्यूद्वारे आणि ३४,२००,००० इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जात आहेत. १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूसाठी कंपनीनं ४२७ ते ४५० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

प्रीमिअम लिस्टिंगची अपेक्षा

प्रीमियर एनर्जीजच्या आयपीओची जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर ९३ टक्क्यांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. ४५१ रुपयांच्या शेअर ग्रे मार्केटमध्ये ४२१ रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच आयपीओची लिस्टिंग ८७१ रुपयांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. २ सप्टेंबर रोजी शेअर ग्राहकांच्या डीमॅट खात्यात क्रेडिट होती आणि त्यानंतर ३ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट होतील. प्रीमिअर एनर्जीज भारतातील दुसरी सर्वात मोठी इंटीग्रेटेड सोलर सेल आणि सोलर मॉड्युल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. टाटा पॉवर सोलर सिस्टम्स, एनटीपीसी असे त्यांचे ग्राहक आहेत.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Premier Energies IPO Tremendous Response from Investor Chances of bumper profit on the first day itself bse nse grey market premium listing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.