Join us  

Premier Energy Listing: एका दिवसात पैसा डबल! १२० टक्के प्रीमिअमसह लिस्ट झाला प्रीमिअम एनर्जीचा शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 11:54 AM

Premier Energy IPO Listing Gain: सोलर सेल आणि सोलर पॅनेल बनवणाऱ्या प्रीमियर एनर्जी या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेत गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आयपीओला बाजारात उत्तम सब्सक्रिप्शन मिळाल्यानंतर मंगळवारी त्याच्या शेअर्सची लिस्टिंगही मोठ्या प्रीमियमसह झालं.

Premier Energy IPO Listing Gain: सोलर सेल आणि सोलर पॅनेल बनवणाऱ्या प्रीमियर एनर्जी या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेत गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आयपीओला बाजारात उत्तम सब्सक्रिप्शन मिळाल्यानंतर मंगळवारी त्याच्या शेअर्सची लिस्टिंगही मोठ्या प्रीमियमसह झालं. प्रीमियर एनर्जीचा शेअर बीएसईवर १२० टक्के प्रीमियमसह ९९१ रुपयांवर लिस्ट झाला. त्याचप्रमाणे एनएसईवर कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग ९९० रुपयांवर झालं.

कंपनीनं आपल्या आयपीओसाठी मर्यादा ४२७ रुपये ते ४५० रुपयांपर्यंत निश्चित केली होती. म्हणजेच लिस्टिंगसह आयपीओच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ५४१ रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीच्या आयपीओच्या प्रत्येक लॉटमध्ये ३३ शेअर्स होते. म्हणजेच आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किमान १४,८५० रुपयांची गरज होती. लिस्टिंग नंतर एका लॉटची किंमत ३२,७०३ रुपये झाली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी प्रत्येक लॉटवर १७,८५३ रुपये कमावले आहेत. दरम्यान, लिस्टिंगनंतर लगेच शेअरमध्ये थोडी घसरण दिसून आली आणि दुपारच्या सुमारास शेअर ८७० रुपयांवर व्यवहार करत होता.

QIB कोटा २१६.६७ पट सब्सक्राइब 

प्रीमियर एनर्जीजच्या आयपीओमध्ये इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी १,२२,८९,२२७ शेअर्स राखीव ठेवण्यात आले असून या श्रेणीतील एकूण २,६६,२७,११,४९१ शेअर्सठी अर्ज प्राप्त झाले होते. या श्रेणीत एकूण २१६.६७ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी ९६,३१,४०६ शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते, यासाठी ४८,१९,७३,२५० शेअर्ससाठी अर्ज मिळाले होते. ही श्रेणी ५०.०४ पट सब्सक्राइब झाली होती. 

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २ कोटी २४ लाख ७३ हजार २७९ शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते. मात्र यासाठी १७ कोटी २७ लाख ५४ हजार ४७२ शेअर्ससाठी अर्ज मिळाले. ही कॅटेगरी ७.६९ पट सब्सक्राइब करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोटा ११.४३ पट सबस्क्राइब झाला होता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक