Lokmat Money >शेअर बाजार > Bajaj Steel Industries Share Price : पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?

Bajaj Steel Industries Share Price : पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?

Bajaj Steel Industries Share Price : कंपनीचा शेअर सोमवारी १७ टक्क्यांनी वधारला. कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:09 PM2024-09-30T12:09:02+5:302024-09-30T12:09:44+5:30

Bajaj Steel Industries Share Price : कंपनीचा शेअर सोमवारी १७ टक्क्यांनी वधारला. कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे.

Prepare to issue bonus shares for the first time Bajaj Steel Industries Share doubled the money in 6 months do you have it | Bajaj Steel Industries Share Price : पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?

Bajaj Steel Industries Share Price : पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?

Bajaj Steel Industries Share Price : बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीजचा शेअर सोमवारी १७ टक्क्यांनी वधारून २९७८ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीज आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट देण्याच्या तयारीत आहे. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये बोनस शेअर्स जारी करण्याबाबत विचार केला जाईल. जर कंपनीच्या संचालक मंडळानं बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता दिली तर कंपनी पहिल्यांदाच आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरित करेल.

सहा महिन्यांत पैसे दुप्पट

बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत १३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. १ एप्रिल २०२४ रोजी कंपनीचा शेअर १२२२.९० रुपयांवर होता. ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २९७८ रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन महिन्यांत बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २९७८ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १००४.०५ रुपये आहे.

५ वर्षांत तुफान वाढ

बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या ५ वर्षात २५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ ऑक्टोबर २०१९ रोजी कंपनीचा शेअर १०८.५० रुपयांवर होता. ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २९७८ रुपयांवर पोहोचलाय. गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १३०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. तर गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ३० सप्टेंबर २०२२ रोजी बजाज स्टील इंडस्ट्रीजचा शेअर ५७९.८५ रुपयांवर होता. ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २९७८ रुपयांवर पोहोचला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Prepare to issue bonus shares for the first time Bajaj Steel Industries Share doubled the money in 6 months do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.