Join us

३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:36 AM

Tata Communications Ltd: टाटाच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. कंपनीनं गुरुवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले होते.

Tata Communications Ltd:  टाटा कम्युनिकेशन्सनं गुरुवारी आपले सप्टेंबर २०२४ तिमाही निकाल जाहीर केले. सप्टेंबरमध्ये टाटा कंपनीचा निव्वळ नफा ३१.७३ टक्क्यांनी घसरून २२७.२७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला २२१.२६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीला ३३२.९३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. गुरुवारी एनएसईवर टाटा कम्युनिकेशन्सचा शेअर ५.५८ टक्क्यांनी घसरून १,८१५.१५ रुपयांवर आला. 

उत्पन्नात वाढ

ऑपरेटिंग इन्कम किंवा व्याज, कर, अवमूल्यन आणि अॅमॉर्टायझेशन पूर्वीचं उत्पन्न वार्षिक आधारावर ०.६ टक्क्यांनी वाढून १,११६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. एबिटा मार्जिन मागील तिमाहीतील १९.९ टक्क्यांवरून १९.४ टक्क्यांवर आलंय. समीक्षाधीन कालावधीत एकूण उत्पन्न वाढून ५,७८१.४७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील वर्षी ४,८९७.८६ कोटी रुपये होतं. समीक्षाधीन तिमाहीत खर्च वाढून ५,५०३.47 कोटी रुपयांवर पोहोचलाय, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ४,५९९.५९ कोटी रुपये होता. सप्टेंबरमध्ये कंपनीनं एका पुनर्रचनेची घोषणा केली, ज्याचा उद्देश आपल्या पूर्ण मालकीच्या टाटा कम्युनिकेशन्स (युके) या उपकंपनीला आपल्या थेट मालकीखाली हस्तांतरित करण्याचा होता.

शेअर्सची स्थिती काय?

कंपनीचा शेअर पाच दिवसांत ७ टक्के आणि गेल्या महिनाभरात १० टक्क्यांनी घसरला. या वर्षी वायटीडीमध्ये आतापर्यंत हा शेअर ३ टक्क्यांनी वधारला आहे. एका वर्षात त्यात २ टक्के आणि पाच वर्षांत ४०५ टक्क्यांची वाढ झाली आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत २,१७५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १,५४३.१० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,५४३.१० कोटी रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार